सर्पमित्रामुळे वाचले मुलीचे प्राण ...
येवला : प्रतिनिधी
पाटोदा येथील 15 वर्षांच्या ऋतुजा संजय आहेर या मुलीला झोपेत असतांना उजव्या हाताच्या बोटावर मण्यार जातीच्या सापाने चावा घेतला. ऋतुजा चे ते लक्षात आले आणि तिने हात झटकला नातेवाईकांनी तो साप टोपली खाली झाकून ठेवला. तातडीने ऋतुजाला येवला येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉ . सुजीत सोनवणे यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. व सर्पमित्र निखील पाटील यांना फोन करून सांगितले. त्यांनी ठिकाणी त्यांनी सर्पमित्र गणेश सोमासे यांना पाठविले असता त्यांनी तो snake rescue केला.त्या वेळेस निखिल पाटिल यांनी डॉ . सुजीत सोनवणे यांना फोन करून सांगितले की तो मण्यार जातीचा विषारी साप आहे.तो पर्यंत त्या मुलीला लक्षणे सुरू झाली होती. तिच्या डोळ्यांची पापण्या जड पडत होती.व तीला झोप लागत होती.डॉ . सुजीत सोनवणे तिच्यावर उपचार सुरू केले. सर्प कोणता ते ओळखला गेल्याने उपचार सोपे झाले व मुलीचे प्राण वाचले .
मण्यार साप चावल्यास लगेच लक्षणे दिसून येत नाहीत.सर्पमित्र निखिल पाटिल यांनी आवाहन केले की मण्यार जातीच्या सापाचा मिलन काळ सुरू झाला आहे.व हा साप फक्त निशाचर आहे.आणि या सापाचे आवडते खाद्य घरातील पाल आहे.त्यामुळे हा साप जास्त करून घरात आढळतो.त्यामूळे नागरिकांनी झोपतांनी पलंग किंवा खाट चा वापर करावा.सर्प निघाल्यास 9421225988 ह्या नंबर वर संपर्क करावा