शहरातील विकासकामांना निधी मिळविण्यात कमी पडणार नाही आमदार दराडे बंधूंच्या हस्ते येवल्यातील विविध कामांचे भूमिपूजन



शहरातील विकासकामांना निधी मिळविण्यात कमी पडणार नाही  

आमदार दराडे बंधूंच्या हस्ते येवल्यातील विविध कामांचे भूमिपूजन  

 

येवला  : प्रतिनिधी


येवला शहरातील विविध विकासकामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करून निधी मिळविण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व इतर मंत्री देखील सहकार्य करत असल्याने अनेक कामे मार्गी लागतील अशी माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांनी दिली.

नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज करण्यात आले. त्यानंतर दराडे बंधूंनी ही माहिती दिली.आमदार दराडे बंधूंसह,माजी आमदार मारोतराव पवार,नगराध्यक्ष बंडू शिरसागर यांच्यासह  युवा नेते कुणाल दराडे,उपनगराध्यक्ष सुरज पटणी, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे, आघाडीचे गटनेते रुपेश लोणारी,नगरसेवक गणेश शिंदे,प्रमोद सस्कर,प्रवीण बनकर,सरोजिनी वखारे,छाया शिरसागर,

शीतल शिंदे,सचिन शिंदे,नीता परदेशी,किरण जावळे,पुष्पा गायकवाड,मलिक शेख,निशार शेख,मुस्ताक शेख,बालुसेठ परदेशी,विजय श्रीश्रीमाळ,नितीन काबरा,संजय कासार,किशोर सोनवणे,बी.आर.लोंढे,शैलेश देसाई आदि उपस्थित होते.

शासन दरबारी अनेक विकासकामांचे प्रस्ताव सादर केलेले असून यातील अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे तर प्रस्तावित कामांसाठी देखील ठोस पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी नगराध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले.

हुडको कॉलनीत डॉ.मुंडे यांच्या घरापासून ते लोखंडी पुलापर्यंतच्या रस्ता,बुंदेलपुरा तालीम ते नब्बू गुडदाणीवाले पर्यंतच्या रस्ता व आयना मस्जिद ते उमरावबी संगीर हालपर्यंतच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या शुभारंभ दराडे बंधूच्या व मारोतराव पवार,क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.ख्रिस्ती समाजचर्चला संरक्षक भिंत व परिसर सुधारणा करण्याच्या दोन कामांचे सर्व्हे नंबर ११२ व ११७ मध्ये भूमिपूजन करण्यात आले.पटनी गल्ली ते महाराणा प्रताप चौक पर्यंत झालेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा लोकार्पण करण्यात आले.दरम्यान,शुक्रवारी खासदार निधीतून होणाऱ्या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे व इतर दोन कामांचे भूमिपूजन देखील केले जाणार आहे अशी माहितीही क्षीरसागर यांनी दिली.

फोटो

येवला : शहरातील विविध विकासकामाचे भूमिपूजन करतांना आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,माजी आमदार मारोतराव पवार,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,सुरज पटनी आदि.



 


थोडे नवीन जरा जुने