कंचन सुधा इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ‘कृष्ण जन्माष्टमी‘ उत्साहात साजरी




कंचन सुधा इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये 'कृष्ण जन्माष्टमी' उत्साहात साजरी 

येवला:- प्रतििनिधी
कंचन सुधा इंग्लिा मिडियम स्कुल, येवला येथील प्रायमरी व प्रि - प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी कृष्ण आणि राधा यांच्या वेाभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी शाळेच्या प्रांगणात दहीहंडीचे आयोजन केले होते. इ.6वी तील विद्यार्थी शिवम देवरे याने आपल्या वक्तव्याद्वारे आणि इ.5वी तील कस्तुरी पाटील हिने आपल्या गायनाद्वारे उपस्थितांचे मने जिंकली. तसेच शिक्षिका स्वाती चौधरी यांनी आपल्या मधुर आवाजात गवळण सादर केली व शिक्षिका ज्योती गायकवाड यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी जन्माष्टमी आणि दहीहंडीविशेष समुह नृत्य सादर केले. 
यावेळी प्रायमरी विभागाच्या ऍक्टीव्हीटी इन्चार्ज वर्षा जयस्वाल प्री - प्रायमरी इन्चार्ज प्रतिक्षा पाटील, ऍक्टीव्हीटी इन्चार्ज राधिका भावसार तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही विशेष सहकार्य लाभले.   
यावेळी शाळेचे प्राचार्य नानासाहेब दवंगे आणि पर्यवेक्षक  सागर भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.       
या प्रसंगी शाळेचे संस्थापक . अजय जैन, समन्वयक  अक्षय जैन व ट्रस्टी समिक्षा जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. 
   


थोडे नवीन जरा जुने