सहसंचालक गोविंद यांनी केला आदर्श शिक्षक कुऱ्हाडेचा सत्कार
येवला : प्रतिनिधी
प्रामाणिक काम केले तर मिळणारे समाधान चिरकालीन असते.अश्या कामाची एक ना एक दिवस आपल्या कार्याची पावती नक्की मिळते.विध्यार्थी हित नसानसात भिनल्यागत काम करनाऱ्या शिक्षकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळणे अभिमानास्पद वाटते असे प्रतिपादन विभागीय शिक्षण सहसंचालक दिलीप गोविंद यांनी केले.
राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नानासाहेब कुऱ्हाडे यांची आज भेट घेऊन सहसंचालक दिलीप गोविंद यांनी सत्कार केला.यावेळी त्यांनी हे कौतुकाचे उद्गार काढले.
याप्रसंगी गोविंद यांनी कुऱ्हाडे यांना सुरगाण्यात रुजू केलेल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या.कुर्हाडे यांनी आदिवासी भागातच आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता,याची उपस्थितांना खास आठवण करून दिली. आदिवासी भागात सुद्धा सोळा वर्षांपूर्वी अनेक उपक्रम राबवून आपल्या कामाची चुणूक दाखवून आज मिळालेला राज्य पुरस्काराची त्यांनी नक्की उंची वाढविल्याचे समाधान गोविंद यांनी व्यक्त केले.यापुढील काळात अजून जोमाने काम करून आदर्श विध्यार्थी घडवा,या कार्यातच सर्वात मोठे समाधान असल्याचे गोविंद म्हणाले.
सत्काराप्रसंगी शिक्षक समितीचे नेते भाऊसाहेब साळी,शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब बोराडे,शैलेश आहेर,संघ नेते गोकुळ वाघ,तंत्रस्नेही शिक्षक सुभाष विंचू, सुनील पवार,सुरेश वाघ,लता कुऱ्हाडे,वेदांत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.श्री कुऱ्हाडे यांनी आभार मानले.
Yeola 16_4
येवला : आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नानासाहेब कुऱ्हाडे यांचा सत्कार करतांना विभागीय शिक्षण सहसंचालक दिलीप गोविंद.समवेत शिक्षक नेते