मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश



अंदरसुल येथील नामांकित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी कु.दिव्या बाळासाहेब सोनवणे इयत्ता 5 वी या हिने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत 14 वर्षाच्या खाली,30 किलो वजन गटात दुसरा क्रमांक पटकावला.दिव्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.या स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक रोहिदास ठाकरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
दिव्याने केलेल्या या कामगिरीने तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अरुण भांडगे,सेक्रेटरी अॅड.सुभाषराव सोनवणे, संचालक मकरणदशेठ सोनवणे, अमोल सोनवणे, राजेंद्र गायकवाड सर,प्रिन्सिपल अल्ताफ खान,ज्यु कॉलेजचे प्रिन्सिपल सचिन सोनवणे, जयश्री परदेशी,जालिंदर म्हस्के,माधुरी माळी,अजहर खतीब,गणेश सोनवणे, दीपक खैरनार,शिवाजी झांबरे,प्रशांत बिवाल, यांनी अभिनंदन केले.व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
थोडे नवीन जरा जुने