तालुक्यात झालेले अत्यल्प पर्जन्यानामुळे तालुक्यात उद्भवलेली दुष्काळ परिस्थितीची पाहणी करुन येवला तालुका दुष्काळी जाहिर करण्याची मागणी छावा संघर्ष माथाडी व जनरल कागार युनियनच्या वतीने करण्यात आली असुन सदर बाबत तहसिलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
येवला तालुक्यात चालु वर्षात अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात केलेली पिकांची लागवड देखील पावसा अभावी वाया गेली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. पाऊन न पडल्याने जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी चारा उपलब्ध नसल्याने पशुधनाचे हाल होत आहे. मागील वर्षी शेकर्यांचे झालेले नुकसानी बाबत अद्याप तालुक्यातील काही गावात नुकसान भरपाई मिळालेली नाही. सध्याची तालुक्याची परिस्थिती पहाता भिषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली असुन शेतकरी हतबल झाला आहे. पिक लागवडीसाठी घेतलेले कर्ज, मजुरांचे पैसे याकामी शेतकरी कर्जबाजारी झाला असुन निघालेल्या थोड्या फार शेतमालाला देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ तालुक्यातील प्रत्येक गावात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्यात यावे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. नुकसान झालेले वंचीत शेतकर्यांना त्यांचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळावे. तालुक्यात चारा छावन्या उभारण्यात याव्यात आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसिलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी छावा संघर्ष माथाडी व जनरल कामगार युनियनचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे, तालुका अध्यक्ष रामनाथ कोल्हे, सागर वाकचौरे, दिपक सोनवणे, सुदाम कोल्हे, बाबाजी सहाणे, प्रविण गुडघे, संतोष कोल्हे, मच्छिंद्र देवरे, रोहित कोल्हे, गणेश कोल्हे, लक्ष्मण कादंळकर आदि उपस्थित होते.