संतोष विद्यालयातील खेळाडूंची कुस्ती,कराटे,फुटबॉल स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

संतोष विद्यालयातील खेळाडूंची कुस्ती,कराटे,फुटबॉल स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

 


येवला : प्रतिनिधी

 बाभूळगाव येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी केली.यामुळे विद्यालयातील खेळाडूंची कुस्ती,कराटे,फुटबॉल स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड झाली आहे.   

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा बलकवडे व्यायाम शाळा भगूर या ठिकाणी पार पडल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील मल्लांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.९६ किलो वजनी गटात संतोष विद्यालयाचा मल्ल प्रणव पवार याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत देखिल विद्यालयातील १९ वर्षे वयोगटात प्रतीक्षा नंदनकर या विद्यार्थिनीची प्रथम क्रमांक मिळवल्याने तिची विभागीय स्पर्धेत निवड झाली. ब्रान्स स्कूल देवळाली या ठिकाणी पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.तर संघातील रोहिणी चव्हाण,दीक्षिता धुम आणि रुचिता चौधरी या तीन विद्यार्थिनीनी संघात चमकदार कामगिरी केल्यामुळे निवड चाचणी मधुन विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

हे खेळाडू आता विभागीय स्पर्धेत नंदुरबार,धुळे, येथे खेळणार आहेत.यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सागर मुटेकर यांचे मार्दर्शन लाभले. तर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,शिक्षक आमदार किशोर दराडे,प्राचार्य गोरख येवले,उपप्राचार्य आप्पासाहेब कदम,विभाग प्रमुख संतोष विंचू,सेमीचे विभाग प्रमुख विठ्ठल परदेशी,दत्ता खोकले,प्रदीप पाटील,संतोष खंदारे,मनोज खैरे,भाऊसाहेब अनर्थे,किरण पैठणकर,राहुल गोलाईत,अरुण जाधव,सुशील गायकवाड,हरिभाऊ भामरे,राहुल भालेराव,नवनाथ जाधव, समाधान गायकवाड,विलास पिंगट,किरण गायकवाड, अधीक्षक सचिन मुंढे,तुषार जेजुरकर,मेजर ज्ञानेश्वर कव्हात,भगवान रोकडे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.



फोटो Yeola 29_3,4

बाभूळगाव : विभागीय स्तरावर निवड झालेल्या विध्यार्थ्यासह प्राचार्य गोरख येवले व शिक्षक 

 



थोडे नवीन जरा जुने