वितरीका २९ वरील बंधारे भरुन देण्याचे आदेश








वितरीका २९ वरील बंधारे भरुन देण्याचे आदेश
 येवला : प्रतिनिधी
पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सुरु होऊन तीन आठवडे उलटूनही पाणी मिळत नसल्याने पुरणगाव, जळगाव नेऊर, नेवरगाव, पिंपळगाव लेप येथील शेतकर्‍यांनी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार यांच्याकडे कैफियत मांडली. पवार यांनी तत्काळ कालवा अभियंता भागवत यांच्याशी संपर्क साधून त्वरीत पाणी सोडण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अभियंता भागवत यांनी तत्काळ वितरीका क्र. २९ वरील बंधारे भरुन देण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले.
पाणी सोडल्याने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. काही शेतकर्‍यांनी पाटावर जाऊन त्यांनी वितरीका क्र. २९ चे गेट खुले केले व वितरीका २९ वरील सर्व बंधारे भरुन घेण्यासाठी पाणी सोडले. यावेळी तुकाराम शिंदे, नंदू झांबरे, विकास ठोंबरे, रावसाहेब ठोंबरे, गणेश पाटील, माणिक रसाळ, साहेबराव दौंडे, गणपतराव काळे, गणपतराव ठोंबरे, साखरचंद सौंदाणे, बाळासाहेब सौंदाणे, सुधाकर ठोंबरे आदी शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने