एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात आय.टी. विभागात सेमिनारचे आयोजन.
येवला : प्रतिनिधी
बाभुळगाव ता येवला येथील एस.एन.डी अभियांत्रिकी महाविध्यालयात "डेटा सायन्स आणि बिग डेटा" या विषयावर माहिती आणि तंत्रज्ञान विभागामध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी प्रत्येक सत्रात वेगवेगळ्या विषयावरील सेमिनार
व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते याचाच भाग म्हणून "Edgematics Technologies" या दुबई येथील नामांकित कंपनीतील माहिती तंत्रज्ञान अभियंते श्री.तौसिफ़ सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली "डेटा सायन्स आणि बिग डेटा" या आधुनिक तंत्रज्ञानावरील विषयाचे आयोजन दिनांक ०४/०९/२०१८ रोजी करण्यात आले.
सदर सेमिनारसाठी तृतीय व चतुर्थ वर्षातील मुलांची उपस्थिती होती. माहिती तंत्रज्ञान विभागातील
सर्व शिक्षक सदर सेमिनार साठी हजर होते.
उदघाटनपर भाषणामध्ये प्रा.डॉ.कुदळ एच. एन. यांनी सदर कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.रोकडे पी. पी. , प्रा.भोईर के. ए., प्रा.चव्हाण व्ही. ए. व प्रा.शेळके एन. एल. यांनी मोलाचे सहकार्य केले.