भागवत बंधूनी खुली करून दिली संदीपची यशाची वाट
येवला : प्रतिनिधी
पीडित, गरजू, आपदग्रस्त, शैक्षणिक बाबतीत सदैव मदतीसाठी तत्पर व संवेदनशील असणारे भागवत बंधू संदीप बागल यांच्याविषयी माहिती मिळताच मदतीसाठी धावून आले. संदीपला पदवी नंतर MPSC वा UPSC चा अभ्यास करण्यासाठी नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक चे अध्यक्ष विष्णूभाऊ भागवत व येवला तालुक्याचे शिवसेनेचे कर्तव्यदक्ष उपसभापती तथा शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संघटक रुपचंदभाऊ भागवत यांनी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी अत्यंत महत्वाची पुस्तके घेऊन दिली. या पुस्तकांचा वापर स्वतःच्या अभ्यासाबरोबर इतर गरजूंना देखील करू द्यावा अशी अपेक्षा रुपचंदभाऊंनी व्यक्त केली. रुपचंदभाऊ भागवत यांचे सोबत, मकरंद सोनवणे, दीपक जगताप, प्रा. विलास भागवत, अमोल सोनवणे, फाउंडेशन चे देविदास जानराव, ज्ञानेश्वर भागवत, एकनाथ भालेराव, मनोज भागवत, सोमनाथ भागवत, बाबासाहेब आहेर हे पुस्तके घेऊन आले. यावेळी रघुनाथ सोनवणे, बाळाजी गोराणे, एकनाथ जाधव, भरत बागल, संतोष गायकवाड, अनिस शेख, अल्ताफ शेख, गोरख बागल, वाल्मीक बागल, हरिभाऊ बागल, ऋषिकेश देशमुख, भास्कर गोराणे सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
उंदीरवाडी ता येवला येथे संदीप भरत बागल हा अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेला. दारिद्र्य पाचवीला पुजलेले, लहानपणीच आईचे निधन झाले. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी वडिलांवर आली. जमीन मात्र एकरभर. त्यामुळे मजुरीशिवाय पर्याय नव्हता. त्यात संदीपचे पालन पोषण, यामुळे लहानपणी संदीपचा अत्यंत हलाखीत सांभाळ झाला. परंतु बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. उंदीरवाडी जि प शाळेत प्रवेश घेतलेला संदीप अभ्यासात चमकू लागला. सतत टॉप थ्री मध्ये असणारा संदीप माध्यमिक शाळेत देखील आपले आपली गुणवत्ता दाखवू लागला. अतिशय हुशार असणाऱ्या संदीपला परिस्थितीमुळे शिक्षक गावकऱ्यांची सहानुभूती मिळत होती. त्यामुळे कुणाचे वापरलेले, टाकून दिलेले कपडे, जुने पुस्तके वापरून शिक्षणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले. दहावीत ७६.२०% मार्क मिळवून माध्यमिक विद्यालयात टॉप थ्री मध्ये यश संपादन केले.
बारावीचा प्रवेश अंदरसुल येथील शांताबाई सोनवणे ज्युनियर कॉलेज मध्ये कॉमर्स ला प्रवेश घेतला. मात्र आता शिक्षणाचा खडतर प्रवास सुरु झाला. शिक्षणाचा खर्च, कॉलेजचे नियम, शिस्त पाळण्यासाठी ड्रेस कोड, शैक्षणिक साहित्य, प्रवास यासाठी खर्च येणार होता. परंतु इच्छाशक्तीपुढे परिस्थिती देखील नतमस्तक होते. याप्रमाणे जिद्द व मेहनती स्वभावामुळे संदीप आता सुट्टीच्या दिवशी शेतमजुरी, खतभरणे, विहीर खोदाई असे कामे करू लागला. पण एवढी मेहनत करत असतांना अभ्यासात मात्र तसूभरही मागे हटला नाही. उलट मेहनतीच्या पैशामुळे तो अभ्यासाशी एकरूप झाला व जीव तोडून अभ्यास करू लागला आणि बारावी कॉमर्स ला ८३.८५% गुण मिळवत अंदरसुल कॉमर्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या परिस्थितीत मकरंद सोनवणे यांचे त्याला खूप सहकार्य लाभले. परिसरातून त्याच्या या हुशारीचे सतत कौतुक केले जाते व संदीपचा अभिमान असल्याचे सांगितले जाते.
गुणवत्तेच्या जोरावर संजीवनी आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कोपरगाव येथे प्रवेश घेतला. तेथेही अभ्यासाची चुणूक दाखवत गुणवत्तेची त्याची परंपरा टिकवत सलग प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवत आहे. पण खर्च त्याच्या अभ्यासातील मेहनतीमुळे मिळणाऱ्या सहनुभूतीवर अवलंबून आहे. त्याची अभ्यासातील लगन पाहून कुणीही मदतीचा हात पुढे करतात पण मदत करू करून किती करावी यावर प्रत्येकाच्या परिस्थिती पुढे मर्यादा येतात. आता त्याच्या शिक्षणावरील खर्च देखील वाढत चालला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने ते देखील त्याला हवा असलेला खर्च किंवा पुस्तके नाही घेवून देऊ शकत नाही. नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व रुपचंदभाऊ भागवत यांचेमार्फत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी महत्वाची सर्व पुस्तके त्याला देण्यात आली. कडक अभ्यास करून आपल्या या मदतीचे चीज करेल व मेहनत करून एक दिवस आपली मान अभिमानाने उंच करील अशी ग्वाही यावेळी संदीपने दिली. वडील भरत बागल व सावत्र आई शीला बागल हे आपल्या जिद्दी मुलासाठी अहोरात्र कष्ट करत आहे व त्याला प्रेरणा देत आहे. त्यांच्या या स्वप्नांना त्याने कधीही तडा जाऊ दिला नाही.
संदीपची मेहनत, जिद्द, चिकाटी बघता त्याला नारायणगिरी महाराज फाऊंडेशन नाशिक कडून संदीपला अभ्यासासाठी आवश्यक व महत्वाचे पुस्तके घेवून देण्यात आले व या पुस्तकांमुळे तो मोठा अधिकारी होणार असा आत्मविश्वास आहे. नक्कीच त्याचा अभ्यास बघता अशी मदत करून गरीब कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भागवत बंधूंचा यामागे सिंहाचा वाटा असणार आहे. शिवसेना येवला तालुका उपसभापती तथा येवला लासलगाव मतदार संघ शिवसेना संघटक यांचे मार्फत फाऊंडेशन असे सामाजिक, शैक्षणिक काम चालू आहे आणि राहणार.