शिवसेना नवनियुक्त पद अधिकारी याचा सत्कार.
येवला: प्रतिनिधी
शिवसेना येवला तालुका वतीने नवनियुक्त पद अधिकार्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम सुर्या लाॅन्स येथे संपन्न करण्यात आला. यावेळी सहसंपर्कप्रमुख संभाजी राजे पवार उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे तालुकाप्रमुख रतन बोरणारे उपसभापती रूपचंद्र भागवत वाल्मिकराव गोरे शहरप्रमुख राजभाऊ लोणारी प स सदस्य प्रविम गायकवाड युवासेना चिटणिस अरूण शेलार युवासेना तालुकाप्रमुख प्रजव्ल पटेल शहर प्रमुख लक्षण गवळी अमोल सोनवणे धिरज परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी तालुकाप्रमुख रतन बोरणारे यांनी सघटंनात्मक कामाला प्राधान्य देण्याचे अहवान केले.शिवसेना ही अभेद्य किल्ला असुन मिशन २०१९ डोळ्यासमोर ठेवुन कामाला लागा असे अहवान वक्तानी केले या प्रसगी संभाजी राजे पवार भास्कर कोंढरे रूपचंद्र भागवत धिरज परदेशी प्रविण गायकवाड ञ्यबक बडे वाल्मिकराव गोरे आदी मनोगत व्यक्त केली.