येवल्यात ज्येष्ठांसाठीच्या विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन
येवला : प्रतिनिधी
शहरात स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी खासदार निधीतुन उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्र व सभागृहाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
नगरपरिषदेने दिलेल्या मोकळ्या भूखंडावर खासदार निधीतुन उभारण्यात येणाऱ्या या विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, अंबादास बनकर, उद्योगपती अरुण गुजराथी, सुशीलचंद्र गुजराथी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, रायभान काळे, विठ्ठलराव शेलार, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, आदी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी यांचे हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
प्रारंभी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमास सुरुवात झाली,
याप्रसंगी बॊलताना खासदार चव्हाण यांनी ज्येष्ठांसाठी सर्वोत्तपरी मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आमदार दराडे यांनी ज्येष्ठांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या विरंगुळा केंद्रास नगरपालीच्या वतीने कंपाउंड करून देणार असल्याचे नगराध्यक्ष क्षीरसागर व मुख्याधिकारी नांदुरकर यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक प्रमोद सस्कर, राजेंद्र लोणारी, छायाताई देसाई, शीतल शिंदे, पद्मा शिंदे, छायाताई क्षीरसागर, सरोजिनी वखारे, जयश्री गायकवाड, नीता परदेशी, तात्या लोहारे, आनंद शिंदे, निलेश जावळे, संगाचे गोविंदराव खराडे, तुकाराम पवार, विजय पोंदे, निंबा वाणी, शामसुंदर काबरा, अशोक जाधव, राजेंद्र आहेर, बाळासाहेब पाटोदकर, दिनकर कंदलकर, सुभाष शूळ, माधव गंगापूरकर, रावसाहेब दाभाडे, आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन दिलीप पाटील यांनी केले.