देवठाण येथील चिमुकल्यांनी खाऊचे पैसे दिले केरळच्या पूरग्रस्तांसाठी
येवला : प्रतिनिधी
खाऊ साठी मिळालेला रुपया-रुपया साठवून देवठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी पाचशे रुपये जमा केले व ते केरळच्या पूरग्रस्तांसाठी जमा केले आहेत.
चिमुकल्यांचा पॉकेटमनी म्हणजे पाच किंवा दहा रुपये..या पैशांचा एकतर काहीतरी खेळणे किंवा खाऊसाठी ते उपयोग करतात. मात्र देवठाण येथील या चिमुकल्यांनी लहानग्या वयातच समाजाप्रती सहानुभूतीचे मूल्य दाखवले आणि शक्य तेवढी मदत म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हातभार लावत पाचशे रुपये जमा केले.या चिमुकल्यांनी जमा केले रक्कम शाळेच्या शिक्षकांचा धनादेशाद्वारे जमा केली आहे.मुख्याध्यापक धोंडु माळी, सहशिक्षक माधव पिंगळे,गोपाळ राठोड,मनोज टापरे,अकिल शेख,कविता वाजे यांनी पुढाकार घेत चिमुकल्यांचे कौतुक केले.
फोटो Yeola 4_9
देवठाण : केरळ मधील पूरग्रस्तांसाठी खाऊचे पैसे जमा करताना चिमुकले