कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणाऱ्या भूमिअभिलेख कर्मचाऱ्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने केली अटक


कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणाऱ्या  भूमिअभिलेख  कर्मचाऱ्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने केली अटक 

येवला : प्रतिनिधी 

मालमत्ता उतारा देण्यासाठी कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणाऱ्या येवला भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार यास नाशिक लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. 

येवला भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार मुरलीधर शंकर ठाकरे याने मालमत्ता उतारा देण्यासाठी तक्रारदार यांचे कडे शासकीय फी व्यतिरिक्त १८० रुपये अथवा एक कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणी केले म्हणून तक्रारदारयांनी नाशिक लाच लुचपत विभागात तक्रार केली होती.  त्यानुसार शुक्रवारी येवला भूमिअभिलेख कार्यालयात  कोऱ्या कागदाचा एक रिम स्वीकारताना लाच लुचपत विभागाने सापळा रचून ठाकरे यांना रंगेहाथ पकडले. 


थोडे नवीन जरा जुने