अन् दिव्याने ज्ञानेश्वरला वाचवले.
येवला.-शहरात गणेश उत्साह धामधुमित सुरु असताना इयत्ता पाचवित शिकणार्या विद्यार्थीनीने एका मुलास वाचविले.शहरातील म्हसोबा नगर येथे घरघुती गणपती जवल गल्लीतील सर्वजण आरती करत व लहान मुले तिथेच खेलत.असा नित्यक्रम चालू असताना दिनांक 21 शुक्रवार रोजी संध्याकाली आरती झाल्यानंतर लहान मुले तिथेच खेलत असतांना ज्ञानेश्वर अशोक परसुरे वय 8 वर्ष खेलत असताना त्याच्या हातात चुकुन लाइट माल आली ,त्या लाइट मालेचा शाँक लागून ज्ञानेश्वर खाली पडला हे पाहुन शेजारीच खेलत असलेल्या दिव्या सोमनाथ खले वय 10 हिने प्रसंगावधान राखत ज्ञानेश्वरला मागे ओढले.त्यामुले लाइट माला तुटली व ज्ञानेश्वर वाचला.सदर प्रकारात ज्ञानेश्वरच्या बोटाला छोट्यशा जखमा झाल्या तर दिव्यालाही शाँक लागला. परंतु दिव्याने दाखविलेले प्रसंगावधानाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असुन दिव्या जनता विद्यालय येवला येथे इयत्ता पाचवीत शिकत असुन ती आर्यन स्केटींग क्लबची विद्यार्थीनी आहे