महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ग्राहकांना मोफत टोमॅटो वितरण करीत निषेध


 
 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ग्राहकांना मोफत टोमॅटो वितरण करीत निषेध

येवला . प्रतिनिधी
शेतमालाला भाव नसल्याने येवला शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ग्राहकांना मोफत टोमॅटो वितरण करण्यात येऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांकडे सरकारचे असलेले दुर्लक्ष, शेतमालाला भाव मिळत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवल्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हे  अनोखे आंदोलन करण्यात आले.  
शेतकर्‍याचा शेतमाल उत्पादनावर झालेला खर्च फिटने मुश्कील असून टोमॅटोस दहा ते पन्नास रुपये कॅरेट इतका कमी दर मिळत आहे. त्यात  जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकर्‍यांना टोमॅटो हा जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली असुन शेतकर्‍यांना शेतमालाला भाव मिळावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने येवल्यात आज अनोखे आंदोलन करण्यात आले त्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ग्राहकांना मोफत  टोमॅटो वितरण केले.  यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शासनाचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.    
याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश पटेल, रामदास लासूरे, नकुल घागरे, गौरव कांबळे, महेश लासुरे, राहुल जाधव, महेंद्र जाधव, लखन पाटोळे, सागर  पवार, गणेश चव्हाण, मयूर मढवई, सुमित बगडाने, योगेश मढवई, भरत भुजाडे, मयूर कोथमिरे आदी उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने