येणाऱ्या निवडणूका शेतीमालाला रास्त भाव याच मुद्यावर होणार! -- शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल घनवट

येणाऱ्या निवडणूका शेतीमालाला रास्त भाव याच मुद्यावर होणार! --
 शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल  घनवट. 

येवला - प्रतिनिधी
देशातील लोक सभा / विधानसभा निवडणुकीत शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधारित रास्त भाव याच मुद्यावर होणार असून शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्या ऐवजी  आपल्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी जागृत होण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मंडल आयोग, राम मंदिर, आरक्षण या मुद्द्यावर अनेक पक्षांनी निवडणूका जिंकल्या मात्र आजच्या परिस्थितीत कुठल्याही  शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला. त्यामुळे शेतकरी आंदोलन कोणते स्वरूप धारण करू शकेल हे सांगता येत नाही. असे मत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले. शेतकरी संघटनेचे अधिवेशन डिसेंबर महिन्यात शिर्डी येथे होत असून मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा होणार आहेत. शेतकरी संघटनेचे संस्थापक  शरद जोशी यांच्या विचाराने आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.असे प्रतिपादन अनिल घनवट यांनी केले. 
        या प्रसंगी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे सतिश  दाणी आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.   कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न मांडले,बॅन्कांची सक्तीची वसुली, वीजबिल वसुली, टमाटे, कांदे यांचे पडलेल्या भावावर चर्चा झाली. गावोगाव सभा घेऊन तरूणांना शेती मालाला रास्त भाव मिळण्यासाठी जागृत करण्याची मोहीम हाती घेऊन शेतकरी संघटनेचे अधिवेशन यशस्वी करण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे, संतु पाटील झांबरे, यांनी सांगितले. 
           महिला आघाडीच्या संध्या पगारे, सिमा नरोडे यांनी शरद जोशींचा विचार पुन्हा एकदा घरोघर पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा शेतकरी महिलांनी मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला  
         शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरूण जाधव, शेतकरी संघटना नेते अनिस पटेल, शंकर पुरकर, नाशिकचे रामनाथ ढिकले,  योगेश सोमवंशी,भगवान बोराडे  बापूसाहेब पगारे ,सुभाष सोनवणे, डाॅ. जगझाप, झाफर पठाण यांनी आपली मते व्यक्त केली.   
     या कार्यक्रमास सुरेश जेजूरकर, शिवाजी वाघ, बाळासाहेब गायकवाड, बाजीराव  कोकाटे, माणिक सूर्यवंशी,  शाहीर बोराडे, त्र्यंबक चव्हाणके, सह मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने