कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना

कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना


येवला : प्रतिनिधी
तब्बल १३१ वर्षांची महान परंपरा असलेला येवला शहरातील कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना मिरवणूक, अडीच तास चाललेल्या या मिरवणुकीत तालमीच्या युवक कार्यकर्त्यांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनीच मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी दाखविलेले पारंपारिक लाठी-बनाटी फिरविण्याचे मैदानी प्रदर्शन सर्वांचेच लक्ष वेधून गेले.प्रथम मानाच्या या तालीम संघाच्या मिरवणुकीत नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,भोलानाथ लोणारी,श्रीमती सुंदराबाई लोणारी,तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र लोणारी,भीमराज नागपुरे,राजकुमार कासार,प्रभाकर ठाकूर,खलील शेख,मुकुंद पोफळे,कृष्णाआप्पा  कंदलकर,चंद्रकांत कासार,हिरामण पराते,योगेश देशमुख,लक्ष्मण गवळी,सुभाष शेटे,सुभाष निकम,नितीन आहेर,दीपक लोणारी,नगसेवक सचिन मोरे,माजी नगरसेवक सागर लोणारी,शंकरराव क्षीरसागर,प्रकाश लोणारी,रवी हाबडे,रामेश्वर भांबारे,रामेश्वर हाबडे,बाळू पैलवान नागपुरे,राहुल लोणारी,प्रभाकांत पटेल,श्रीपाद जोशी,किरण पटेल यांच्यासह मोठया संख्येने मान्यवर सहभागी झाले होते. प्रथम मानाच्या गणेशाची सायंकाळी सहाच्या दरम्यान लोणार गल्लीतील तालीमसमोर प्रतिष्ठापना होताना, आमदार किशोर दराडे व इतर मान्यवरांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली.



थोडे नवीन जरा जुने