गणेश उत्सव स्पर्धा २०१७ चा बक्षिस वितरण सोहळा दिमाखात संपन्न
येवला : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश उत्सव स्पर्धा २०१७ चा बक्षिस वितरण सोहळा येथील क्रिडा प्रबोधिनी संस्कृती मंच येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, पणन महासंगाच्या उषाताई शिंदे, येवल्याचे नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, बाळासाहेब लोखंडे, नगरसेवक प्रमोद सस्कर, प्रवीण बनकर, सचिन मोरे, पुष्पा गायकवाड, छायाताई क्षिरसागर, राजश्री पहिलवान, धनंजय कुलकर्णी, साहेबराव सैद, धिरज परदेशी, अविनाश कुक्कर, नारायण शिंदे, भुषण लाघवे, डी.पी. मोरे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते शहरातील २७ सार्वजनिक गणेश मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मंडळाचे हे २२ वे वर्ष होते.
येवले शहरात उत्सवाचे पावित्र्य सांभाळुन समाज प्रबोधन देखावे व पारंपारीक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा येवल्यातील तरुणांनी टिकुन ठेवली असुन ती भविष्यातही कायम रहावी याकरीता तरुणांचा उत्साह वाढावा यासाठी सदर बक्षिस समारंभाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी प्रास्ताविक सादर करतांना सांगीतले.
याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील विध्यार्थानी भाग घेत सामूहिक नृत्य, देशभक्तीपर गीत, लावणी, कॉमेडी सर्कस सादर केली. या स्पर्धकांना मंडळाचे वतीने पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाचे परीक्षण महिला ग्रुपच्या शीतल कोळस, स्मिता परदेशी, सायली खंदारे, सोनल परदेशी यांनी केले, त्यांना सविता जाधव, सुनंदा रहाणे, प्रेरणा माळोकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम रहाणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी संजय सोमासे, सचिन सोनवणे, उत्तम घुले, श्रीकांत खंदारे, अमित मेहता, हेमंत व्यवहारे, मोबीन मलंग, किरण सूर्यवंशी, प्रशांत सोनवणे, विजू वारे आदींनी विशेष परिश्र घेतले. कार्यक्रमास शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.