पारंपारीक वाद्यांचा उत्सवात वापर करण्याचे आवाहन

पारंपारीक वाद्यांचा उत्सवात वापर करण्याचे आवाहन


येवला : प्रतिनिधी
गणेश उत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व गणेश मंडळाची व मोहरम समिती सदस्यांची येवला शहर पोलीस ठाणे येथे शहरातील रस्त्यांची दुर्दशा, खड्डे, स्वच्छता, मोकाट जनावरे, विजेच्या तारा, लाईट, या प्रश्‍नांनी शांतता समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी मनमाड येथील अतिरीक्त पोलीस अधिक्षक श्रीमती राजसुधा, अ‍ॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, येवल्याचे प्रांताधिकारी भिमराज दराडे, तहसिलदार रोहिदास वारुळे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहा.पोलीस निरीक्षक मनोहर मोरे, नायब तहसिलदार प्रकाश बुरुंगुळे, वीज वितरणचे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होते.
सर्व हिंदु मुस्लिम धर्मियांच्या सहकार्याने दोन्ही उत्सवांसोबत आगामी सर्व सणउत्सव पार पाडण्यास पोलीस सक्षम व सज्ज आहे.  उत्सव शांततेत व्हावा, कोणीही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नये, शासनाच्या अटींना अधीन राहून गणशोत्सव साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन करणारांची गय केली जाणार नाही, कायद्याची चौकट तोडु नका. प्रत्येक धर्मियांनी दुसर्‍याच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.  धार्मिक उपक्रम राबवुन नविन पायंडा पाडण्यांत येवुन तणावरहीत उत्सव साजरे करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक नागदरे यांनी यावेळी केले. 
गणेशोत्सव व मोहरम उत्सवाचे काळात कोणाच्या धार्मिक भावना दुखाणार नाहीत याची काळजी येणार्‍या काळात घ्यावी.मोहरम सवारी मिरवणुक तसेच विसर्जण मिरवणूक मार्गात ज्या ठिकाणी अरुंद रस्ते व इतर अडचणी आहेत अशा ठिकाणी प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे असे सांगीतले. यावेळी उपस्थितांनी पालिका प्रशासन व वीज महामंडळावर ताशेरे ओढत पालिका प्रशासन व वीज महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.  त्यात प्रामुख्याने शहरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट, गणेश मंडळांना लागणारे विज कनेक्शन, लोंबणार्‍या धोकेदायक विजेच्या तारांच्या समस्या, मोकाट जनावरे तसेच गणेशोत्सव काळात विजेचे भारनियन करु नये, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. तसेच शहरातील प्रमुख मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे श्री विसर्जन मिरवणुकीत मोठी अडचण असुन येवले नगरपरिषदेने त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची जोरदार मागणी उपस्थितांनी यावेळी केली. याबाबत तहसिलदार वारुळे यांनी संबंधीत सर्व विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येवुन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आवश्‍वासन दिले. नगराध्यक्ष क्षिरसागर यांनी रस्त्यांबाबत व खड्डे बुजविण्या बाबत कार्यवाही सुरु करण्यात आली असुन सर्व खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे सांगीतले.  विज वितरणचे पाटील यांनी सर्व गणेश मंडळांनी विज वितरण कंपनीकडे अर्ज करुन अधिकृत विज कनेक्शन घेण्याचे आवाहन केले.  जेणे करुन कोणताही अपघात व अनुचीत प्रकार घडणार नाही असे सांगीतले.  
प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी बोलताना सांगितले की, उत्सव काळात आपण आनंद घेताना कोणत्याही गैरअफवा पसरवू नये व उत्सव आनंदात साजरे करावे.  येवला हे सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा असणारे शहर आहे. याचे पावित्र्य जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. डीजे डॉल्बीवर शासनाने पूर्ण बंदी घातली असून कोणत्याही मंडळाने डॉल्बीवर अनाठायी खर्च करू नये.  पारंपारीक वाद्यांचा वापर करुन सामाजिक बांधिलकी जोपासून उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.   यावेळी उपस्थित किशोर सोनवणे, अ‍ॅड. शैलेश भावसार, आनंद शिंदे, शहर काझी रफीओद्दीन, अकबर शाह, भुषण शिनकर, अविनाश कुक्कर, धिरज परदेशी, सलीम काझी, आदींनीही आपले मत मांडले.  याप्रसंगी उपस्थित अतिरीक्त पोलीस अधिक्षक राजसुधा यांचा वाढदिवसा निमित्त उपस्थितांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.  सुत्रसंचालन प्रमोद तक्ते यांनी केले.  याप्रसंगी उत्कृष्ट गणेश मंडळ, एक गाव एक गणपती स्पर्धेतील मागील वर्षीच्या विजेत्या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी शिवसेनेचे राजेंद्र लोणारी, रिपाईचे गुड्डु जावळे, बाळासाहेब लोखंडे, लोंढे नाना, भाजपाचे आनंद शिंदे, संजय सोमासे, निसार निंबुवाले, नगरसेवक सचिन मोरे, वसंत पवार, एजाज शेख, रुपेश घोडके, युवराज पाटोळे, गणेश गायकवाड, नगरपरिषदेचे इनादार, बापु मांडवडकर, अशोक कोकाटे, पुरुषोत्तम रहाणे, पोलीस ठाण्याचे चंद्रकांत निर्मळ, रघु सुर्यवंशी, कोतवाल आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने