येवल्यात स्वामी मुक्तानंद विद्यालय इंग्रजी माध्यम विभाग शिक्षक दिन साजरा...
येवला - प्रतिनिधी
येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय इंग्रजी माध्यम विभागामध्ये अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला . शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांप्रती ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून शिक्षकांकरीता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले .विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर गोष्टींचे ज्ञान देण्यासाठी शिक्षक सतत कार्यरत असतात त्यातच कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाचे शिक्षक अत्यल्प पगारामध्ये आपल्या शाळेचे व विद्यार्थ्यांचे नाव लवकिक मिळवण्यासाठी सतत धडपड करीत असतात. या कार्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते .शिक्षक आजारी असेल की शालेय कामकाजात व्यत्यय येतो .म्हणूनच शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालकांनी शिक्षकांकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले . शिबिरामध्ये विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते .यामध्ये फिजिओथेरपिस्ट ,ह्रदया संबंधी आजार, पाठ दुखी, गुडघेदुखी, रक्तदाब रक्तातील साखरेचे प्रमाण इत्यादी आजारांवर चिकित्सा व उपचार संबंधित कार्यवाही करण्यात आली, विद्यार्थी व पालक यांनी शिक्षकांकरीता राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .तसेच शिबिराचा लाभ घेतलेल्या शिक्षकांना मानसिक दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमासाठी गुरुदेव शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद नागडेकर ,उपाध्यक्ष एस. जे .खानापुरे ,दिपक गायकवाड,एस.एम. नागडेकर ,श्रीमती एस.बी .फणसे ,डॉ.ए.एम. पहिलवान, श्रीमती एस. पी. पहिलवान, एस .डी .एडाईत, यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विकास पानपाटील, पालक डॉ.इम्रान सय्यद नुर व शिक्षकांनी अतोनात परिश्रम घेतले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे 21 दिवसीय कामकाज सांभाळले व आभार विद्यार्थी कुमार रितेश भोसले यांनी केले आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला