येवला खरेदी विक्री संघाच्या वतीने आज दराडे बंधूंचा भव्य सत्कार
येवला : प्रतिनिधी
तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या सोमवारी होणार आहे.यावेळी येथील नवनिर्वाचित आमदार दराडे बंधूंचा भव्य सत्कारही करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष दिनेश आव्हाड यांनी दिली.
येथील सहकारी संघाने मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक मका,तूर,मुग इतर धान्य खरेदी करून लक्षवेधी कामगिरी केली आहे.यामुळे अडचणीतील संघ पुन्हा ऊर्जितावस्थेत आला असून त्यामुळे संघाकडे पाहण्याचा नेतेमंडळींसह सभासदांचा दृष्टीकोन दर्जेदार झाला आहे.या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या सभेला महत्त्व आले आहे.
या सभेच्या निमित्ताने संघाच्या आवारात सकाळी ११ वाजता येथील नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार मारोतराव पवार,ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे,सहकार नेते अंबादास बनकर,युवा नेते संभाजीराजे पवार,संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे आदींसह पदाधिकारीही उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष आव्हाड,उपाध्यक्ष भागोजी महाले,व्यवस्थापक बाबासाहेब जाधव तसेच संचालक आशा दत्तात्रय वैद्य,भागुनाथ उशीर,राजेंद्र गायकवाड,जनार्दन खिल्लारे,नाना शेळके संतोष लभडे,भास्कर येवले,अनिल सोनवणे,रघुनाथ पानसरे,सुरेश कदम,दत्तात्रय आहेर,दगडू टर्ले आदींनी केले आहे.