सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयाचा अध्यक्षपदी प्रमोद पाटील तर ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद गुंजाळ यांची निवड
येवला, ता. ४ : येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी दै.सकाळचे बातमीदार प्रमोद पाटील यांची तर सानेगुरुजी ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद गुंजाळ यांची नुकतीच सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
चिचोंडी बुद्रुक येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रामविकास मंडळ सदस्यांची बैठक नुकतीच येथील वाचनालयात पार पडली. यामध्ये पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांची निवडीचा विषय घेण्यात आला. यामध्ये सानेगुरुजी वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रमोद पाटील, उपाध्यक्षपदी साहेबराव खराटे तर सचिवपदी ज्ञानेश्वर पवार यांच्या नावाची तर ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद गुंजाळ, उपाध्यक्षपदी राजेंद्र मढवई तर सचिवपदी नितीन राजगुरू यांच्या नावाला सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली. यावेळी वाचनालयाचे मावळते अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, बापू राजगुरू, सुखदेव मढवई, सोमोदय मढवई, नितीन मढवई, प्रवीण राजगुरू, रावसाहेब खराटे, नामदेव मढवई, साहेबराव मढवई, गोरख खराटे, प्रदीप पाटील, गोरख मढवई, राजेंद्र घोटेकर, सुरेश मढवई, मनोज गुंजाळ, संतोष मढवई, भाऊसाहेब रोकडे, अमोल राजगुरू, राजेंद्र राजगुरू, गोडिराम मढवई, बापू खटाने, सोमनाथ शेळके आदिंसह संचालक, सभासद उपस्थित होते. दरम्यान नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.
-