येवल्यात तहसील कार्यालयावर काँग्रेस-मनसेसह मित्र पक्षाचा वतीने मोर्चा






येवल्यात तहसील कार्यालयावर काँग्रेस-मनसेसह मित्र पक्षाचा वतीने मोर्चा

 

येवला : प्रतिनिधी


द्चाकी लोटून नेत व घोषणाबाजी करत काँग्रेस मनसे व मित्रपक्षांच्या वतीने  तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करावी. तसेच नोटाबंदी भ्रष्टाचार, राफेल घोटाळा, इव्हीएम मशीन घोटाळा यांची चौकशी करण्यात यावी.या मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे मोटरसायकल ढकलत मोर्चा काढण्यात आला.मनसेचे कार्यकर्तेही यात सहभागी होते.

सर्वसामान्य जनता, शेतकरी पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे हैराण झाले आहेत.अशी परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकार कुठल्याही उपाय योजना करतांना दिसत नाही.यावेळी तहसीलदार रोहिदास वळवी याना निवेदन देण्यात आले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख,शहर सरचिटणीस नानासाहेब शिंदे,एकनाथ गायकवाड,उस्मान शेख, संदीप मोरे, दत्तात्रय चव्हाण, अण्णासाहेब पवार, राजेंद्र गणोरे,बळीराम शिंदे, अण्णासाहेब पवार, मंगल परदेशी, अर्चना शिंदे, शिवाजी धनगे,महादू सोळसे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, मनसेचे जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे,शहराध्यक्ष गौरव कांबळे, तालुकाध्यक्ष नकुल घागरे,शैलेश कर्पे,महेश लासुरे,राहुल जाधव,सागर खोडके,विद्यार्थी शहराध्यक्ष महेंद्र जाधव,गणेश चव्हाण,सागर पवार,लखन पाटोळे,गोकुळ पाटील,आबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, सोमनाथ केदारे,सूर्यकांत गोसावी,रणजित संसारे,विनायक वाहुळ,विमल आहेर, किरण शिंदे, भगवान चिते, संजय पगारे, उत्तम चव्हाण, नारायण चव्हाण, बलराम हंडी, बाबुभाई शेख, रंगनाथ गिरी आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.



 
 
 

थोडे नवीन जरा जुने