बनकर पाटील पब्लिक स्कुल,येवला येथे कृष्ण जन्माष्टमी धूम धडाक्यात साजरी...


बनकर पाटील पब्लिक स्कुल,येवला येथे कृष्ण जन्माष्टमी धूम धडाक्यात साजरी...

येवला : प्रतिनिधी
      श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित,बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली .अनेक विद्यार्थ्यांनी  श्री कृष्ण व राधेच्या वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली याबरोबरच बहुतेक विद्यार्थ्यांनी गोप-गोपींच्या वेषभूषेमुळे शाळेचे प्रांगण जणू वृंदावन भासत होते.या वेळी मुलांना जन्माष्टमीचे महत्व विषद केले.यावेळी शाळेत दही-हांडी च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,फेर धरून गौळणीच्या तालावर  विद्यार्थ्यांनी दही हंडी फोडण्याचा मनसोक्त प्रयत्न केला व शेवटी हंडी फोडण्यात यश आले.
यावेळी मुलांना प्रसाद तसेच चॉकलेट वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे संचालक प्रविण बनकर व शाळेचे मुख्याध्यापक पंकज निकम यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छादिल्या.यावेळी सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने