विविध उपक्रमांनी मातोश्री दराडे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये संस्कृत सप्ताह



विविध उपक्रमांनी मातोश्री दराडे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये संस्कृत सप्ताह

 


येवला. : प्रतिनिधी


 बाभूळगाव येथील  मातोश्री आसराबार्इ दराडे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये संस्कृत सप्ताहा  निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने संस्कृत संभाषण वर्ग,संस्कृत श्‍लोक पाठांतर,संस्कृत गीतगायन आणि प्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आली.

संस्कृत दिनाचे औचित्य साधुन आयुर्वेदार्था व बोधनार्थ संस्कृत या विषयावर मुंबईच्या आयुष विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या प्रबोधनपर भाषणामध्ये त्यांनी आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. संस्कृत अध्ययन केल्यामुळेच आयुर्वेदातील श्लोकांचा खरा अर्थ समजू शकतो,त्याकरीता संस्कृत समजून घेवून आयुर्वेदाध्ययन करावे असे त्यांनी सांगीतले. रोग्यांचे गैरसमज दूर करावेत प्रशिक्षित वैदयांनी गोरगरीब लोकांपर्यंत आयुर्वेदाबद्दल जनजागृती करावी असेही ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संपत भताने यांनी डॉ. धर्माधिकारी सरांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण खंडागळे यांनी केले तर डॉ.कौस्तुभ भोर्इर यांनी आभार मानले.

प्रामुख्याने आरोग्य अधिकारी डॉ. पारेख तसेच डॉ.देशपांडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मिनेश चव्हाण आदि प्राध्यापक आदि उपस्थित होते.

फोटो Yeola 6_5

बाभूळगाव : मातोश्री दराडे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आयुष विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांचे स्वागत करतांना प्राचार्य डॉ.संपत भताने.

 



 
 
 

थोडे नवीन जरा जुने