सायगाव येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन




सायगाव येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन
 येवला : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील सायगाव येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उदघाटन तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे याचा हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो महिला व युवकांनी स्वारिप पक्षात प्रवेश केला.
सायगाव येथे स्वारीपचे पदाधिकारी दाखल होताच ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांचा आतिशबाजीत स्वागत करण्यात आले. या वेळी  तालुकाध्यक्ष पगारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांच्या हस्ते  राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महामाता रमाईबाई आंबेडकर यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन पगारे, नगरसेवक अमजदभाई शेख, सचिव अजीजभाई  शेख, सरपंच गणपत खैरणार, विजय घोडेराव याच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित महिलांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गायक विधाता आहिरे यांच्या क्रांती कारी गिताने सभेस सुरवात झाली. यावेळी तालुकाध्यक्ष पगारे, गिताराम आव्हाड, गणपत खैरणार, अजहर शेख, महिला आघाडीच्या आशा आहेर यांची भाषणे झाली. या वेळी शशिकांत जगताप, हमजाभाई मनसुरी, आकाश घोडेराव, बाळासाहेब आहिरे, भाऊसाहेब गरूड, अरूण आव्हाड, हरीभाऊ आहिरे, वसंत घोडेराव, बब्लु शेख, मैलाना शेख, नवनाथ पगारे,कांतीलाल पठारे, रमेश पठारे, योगेश मोरे, भास्कर पठारे, उत्तम पठारे, बशिर शेख, ज्ञानेश्वर आव्हाड, ज्ञानेश्वर कांबळे, शोभा घोडेराव, मणिषा शिंदे, शोभा निकम उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने