अंगणवाडी कर्मचारी महिलांचा थाळीनाद
मोर्चा काढून घोषणा देत प्रकल्प कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला
येवला : प्रतिनिधी
आज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधकिारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून थाळीनाद आदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी महिलांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रकल्प अधिकारी यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शहरातील हुतात्मा स्मारका पासून अंगणवाडी कर्मचारी महिलांनी हातात फलक घेउन घोषणा देत एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मार्चा काढला. ते थे थाळी नाद करत परिसर दणाणून सोडला. गणपती उत्सवापूर्वी ऑगस्ट महिन्याचे मानधन देण्यात यावे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बजेट वाढवावे, २५ पेक्षा कमी मुले असतील तर ती अंगणवाडी केंद्र बंद करुन शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ट करण्यासाठी काढण्यात आलेले आदेश त्वरीत रद्द करावे, अंगणवाडी केंद्राच्या लाभार्थ्यांची संख्या ठरवताना एकुण लाभार्थींची संख्या विचारात घेतली पाहिजे. कारण अंगणवाडी केंद्रातून फक्त ३ ते ६ वर्षाच्या मुलांना सेवा दिली जात नाही. तर ० ते ६ वर्षातील मुलांना सेवा दिली जाते. तसेच गरोदर, स्तनदा व किशोरी मुलींना सेवेचे फायदे दिले जातात. अंगणवाडी केंद्र हे लाभार्थी ठरवून विचारात घेऊन उघडले गेले नाही तर हे लोकसंख्येच्या आधारावर उघडले गेले आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण लोकसंख्य वर आधारीत अंगणवाडी केंद्र उघडले गेले नाही. जे अंगणवाडी केंद्र आहेत ते शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समायोजन करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे जे अंगणवाडी केंद्र बंद होतील तेथे ० ते ६ वयाच्या मुलांना, गरोदर, स्तनदा व किशोरी मुलींना या योजनेच्या फायद्यापासून वंचित रहावे लागणार आहे. तसेच सेविका, मदतनिस रोजगारापासून वंचित राहणार आहेत. एकतर महाराष्ट्रात लोकांना नोकरी व रोजगार नाही त्यांच्यामध्ये ही अजुन भर पडले. अशा प्रकारचे केंद्र सरकारचे कोणतेही आदेश नाहीत म्हणून महाराष्ट्र सरकारने काढलेले आदेश त्वरीत रद्द करावे, या मागणी साठी हे आदोलन करण्यात आले.
ग्रामबालविकास केंद्राचे काम सकाळी ८ ते ६ वाजेपर्यंत करण्याची सक्ती बंद करणे व आठवड्याची हक्काची सुट्टी देणे. नाशिक जिल्ह्यात मे २०१८ पासून ग्रामबालविकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. ग्रामबालविकास केंद्राचे काम सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत करणे म्हणजे दिवसभर सलग १० तास अंगणवाडी कर्मचार्यांना काम करावे लागते. या १० तासात त्यांना विश्रांती नाही. तसेच त्यांची साप्ताहिक व सणाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचार्यांनाही कुटुंब आहे. ग्रामबालविकास केंद्राच्या कामामुळे कर्मचार्यांना कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दुसर्यांच्या मुलांचे कुपोषण दूर करायचे आणि स्वत:च्या मुलांना कुपोषित करायचे. अशी परिस्थिती अंगणवाडी कर्मचार्यांची झाली आहे. म्हणून त्यांना पूर्वीसारखे अंगणवाडी केंद्राचे काम करु द्यावे.
पाच व दहा वर्षाच्या वाढीव रकमेचे फरकासह रक्कम देणे. अनेक सेविकांना केंद्र सरकाचे पाच व दहा वर्षाचे पंचवार्षीक मानधन मिळत होते. जून २०१७ पासून आयुक्त कार्यालयाकडून अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारे दिले जाते. मात्र अंगणवाडी कर्मचार्यांना पाच व दहा वर्षांच्या केंद्राच्या मानधनाची रक्कम दिली जात नाही. जिल्हा व प्रकल्प कार्यालयाने आयुक्तलयात पाठपपुरावा करुन पाच व दहा वर्षाच्या जून २०१७ पासून मानधनाची रक्कम मिळवून द्यावी. अंगणवाडी कर्मचार्यांना कायम कर्मचारी दर्जा देऊन त्यांना शासकीय कर्मचार्यांचे वेतन व भत्ते लागू करा. जनश्री विमा योजनेची अंमल बजावणी करा. दरवर्षी रु. २००० गणवेशा साठी द्या. अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनिसांना अतिरिक्त पदभारासाठी एकूण मानधनाचे ५० टक्के अधिक मानधन देण्यात यावे. सन २००२ च्या नियमानुसार ५० टक्के मुख्यसेविकांची पदे पात्र अंगणवाडी सेविकांमधून भरण्यात यावीत. अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्या जागी त्यांच्या वारसदाराला कामावर घेण्यात यावे. अंगणवाडीच्या रिक्त जागेवर अंगणवाडी कर्मचार्यांची बदली मागितल्यास त्यांना सेवाकाळामध्ये किमान एकदा तरी बदली देण्यात यावी. अंगणवाडीच्या ज्या मदतनिसांना व बालवाडी शिक्षकांना सेविका व मदतनीस म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे त्यांची सेवासलग धरुन सेवेच फायदे देण्यात यावे. सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे रुपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात करण्यात यावे. अंगणवाडी कर्मचार्यांना वारंवार बिट व प्रकल्पात बोलावले जाते मात्र त्यांना टीएडीए दिला जात नाही. आजरोजीपर्यंत प्रकल्प कार्यालयाने पत्रात नमूद केलेले वरील प्रश्न सोडवलेले नाहीत. हा अंगणवाडी कर्मचार्यांवर अन्याय आहे. हे प्रश्न त्वरीत सोडवले नाहीत तर तीव्र आदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळीसंघटनेचे भगवान दवणे, जिल्हा अध्यक्षा राजश्री पानसरे, राजेश सिंह, तालुकाध्य क्षाकुसूम वाडेकर यांचेस अंगणवाडी कर्मचारी महिला मोठ्या संध्येने उपस्थित होत्या.