बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न ..
येवला : प्रतिनिधी
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये यंदाही गणेशोत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी प्रत्येकाने घरात शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला हवी यामुळे जल प्रदूषणावर मोठ्या प्रमाणावर आळा बसेल हि काळाची गरज ओळखून आपणही पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सिद्ध व्हावे यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक प्रविण बनकर यांच्या संकल्पनेतून व शाळेचे प्राचार्य पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेमध्ये बुधवार दि.१२.०९.२०१८ रोजी शाडू मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मुती कार्यशाळेचे (Eco-Friendly Ganesh Idol Workshop) आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये शाळेतील नर्सरी ते ६ वी च्या सर्वच विद्यार्थ्यांनी भाग घेऊन गणेशाची मूर्ती बनविली. विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करत विविध प्रकारच्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवून सर्वांची मने जिंकली.
शाळेच्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख मूर्ती बनवून पर्यावरणास स्वच्छ ठेवण्याचा व यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक बनविण्याची शपत घेतली. सर्व पालकांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची दाद दिली. आपण स्वतः बनविलेली गणेश मूर्तीची स्थापना या वेळी आपल्या घरात करतांना सर्वांना नक्कीच आनंद होणार आहे . या कार्यशाळेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .