ममदापुर ग्रामस्थाचे उपोषण मागे
पाण्यासाठी ममदापुर ग्रामस्थाचे उपोषण प्रांताधिकारी भिमराज दराडे याच्या मध्यस्थीने सरबताचा ग्लास देऊन सोडण्यात आले. ममदापुर येथील ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयाच्या समोर सोमवारी उपोषण सुरू केले होते . जो पर्यंत संबंधित शेतकरी याच्या वर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते. ममदापुर गावा शेजारी बंधारा असुन सदर बंधार्या लगत ऑकवर क्षेत्रात पाच शेतकर्यानी चार विहिरी खोदुन त्या विहिरीत सहा इंच जाडीचे एक दोन नाही तर तब्बल पंचवीस आडवे बोर घातल्याने सदर गावा शेजारील बंधार्या तील पाणी त्या विहिरीत जाते व ते पाणी सहा ते सात शेतकरी विद्युत पंपाच्या सह्याने शेतीसाठी वापरतात तसेच सहा मोठी शेततळे भरून पाणी ठेवतात . या बंधार्यातुन दिड ते दोन किलोमीटर पाईपलाईन आहेत . या वर्षी जेमतेम पाऊस परिसरात झाला त्यामुळे बंधार्यात थोडे पाणी आले ते पाणी देखील संबंधित शेतकरी याच्या तळ्यात व मळ्यात गेले. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महिना भरातच बिकट होऊ शकतो या बंधार्या लगत गावाला पाणि पुरवठा करणारी ग्रामपंचायत मालकीची विहिरी आहे. परंतु बंधारे खालील विहिरी बंधारा कोरडा करतात. परिसरात कुठल्याही पाटाचे किंवा पाट चारीचे पाणी येत नाही तसेच अडवतीस गाव पाणी पुरवठा योजना या गातात नाही . हे पाणी उपसा बंद झाले तर गावातील लोकांना उन्हाळ्यात टॅकरची गरज पडनार नाही . म्हणून ममदापुरचे ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. हा परिसर कायमचा दुष्काळी असुन पिण्याच्या पाण्यासाठी या भागात टॅकर वर अवलंबून रहावे लागते . आणि टॅकर वेळेवर मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी गावाचे पाणी राखीव ठेण्यासाठी वेळोवेळी अर्ज दिले परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही त्यामुळे ममदापुर येथील दत्तु वाघ , अशोक वाघ , सुभाष गोराणे, मुरलीधर वैद्य, छावाचे उपजिल्हा प्रमुख देवीदास गुडघे, महेन्द्र पगारे , संजय पगारे इत्यादी उपोषणासाठी बसले होते. सदर बंधारा हा ग्रामपंचायत कडे देखभालीसाठी वर्ग करण्यात आले असून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यानी पाणी उपसा करणारे शेतकरी यांनी पाणि उपसा बंद करण्याच्या सुचना द्याव्या तसे न झाल्यास संबंधित शेतकरी याच्या वर गुन्हे दाखल करावे आसे पत्र गटविकास अधिकारी याच्या सहीने ग्रामपंचायत ममदापुर याच्या नावे देऊन अहवाल सादर करण्यात यावे आसे पत्र देण्यात आले. हे पत्र प्रांताधिकारी यांनी उपोषणासाठी बसलेले दत्तु वाघ, देवीदास गुडघे, सुभाष गोराणे, मुरलीधर वैद्य, व ग्रामस्थांना देऊन उपोषण सोडण्यात आले.