नवचेतना ऍकॅडमीने दिले ग्रामीण व शहरी बेरोजगारांना मोफत नोकर भरतीपूर्व परीक्षांचे मार्गदर्शन
येवला : प्रतिनिधी
नवचेतना स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन केंद्र, येवला गेल्या 10 वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींना नोकर भरती पूर्व मार्गदर्शन करत आहे.गेल्या 10 वर्षात हजारो विध्यार्थी महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
बेरोजगार मुलांच्या समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विध्यार्थी आणि विध्यार्थीनी शिक्षण घेऊनही सुशिक्षित बेरोजगारीला सामोरे जातात, आपल्या क्षमता लक्षात नआल्याने,योग्य मार्गदर्शना अभावी शिक्षणघेऊनही बेरोजगार असतात . या स्पर्धेच्या युगात प्रत्येक नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धापरिक्षेला सामोरे जावे लागते.त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच विविध खात्याच्या मार्फत नोकरी विषयक लेखी परीक्षा व संरक्षण क्षेत्रात मैदानीचाचणी परीक्षा घेण्यात येतात,त्याविषयीचा अभ्यासक्रम ,प्रश्नपत्रिका स्वरूप आणि शैक्षणिक पात्रता कशी असते यासाठी महात्मा फुले नाट्यगृह,विंचुर रोड येवला येथे महाराष्ट्रातील स्पर्धापरिक्षा पुस्तकांचे लेखक व नामांकित स्पर्धापरिक्षा व्याख्याते प्रा. संजय खंडारे, प्रा. इद्रिस पठाण, प्रा.योगेश भानुसे यांनी भारतीय राज्यघटना व पंचायतराज, चालुघडामोडी तसेच सामान्य विज्ञान या विषयासह विविध नोकर भरतीविषयी 2 दिवस 15 व 16 सप्टेंबर 2018 शनिवार - रविवार,सकाळी 10 ते सायं.5 वा पर्यंत संपूर्ण दिवसभर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाराष्ट्रभर प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट ऍड. किशोर आंबेगावकर यांनी व्यक्तिमत्वविकास आणि स्पर्धापरिक्षेतील अडचणींवर मात करण्याच्या उद्देशाने मोटीवेशनपर मार्गदर्शन केले.
या सेमिनार प्रसंगी पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य भाऊसाहेब गमे सर आणि उदघाटक म्हणून प्रसिद्ध उद्योगपती, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब कापसे उपस्थित होते.
दोन दिवशीय नोकर भरतीपूर्व मोफत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन प्रा.जितेश पगारे व प्रा.संतोष मढवई यांनी केले.
सेमिनार यशस्वी होण्यासाठी नवचेतना ऍकॅडमीचे सर्व विध्यार्थी आणि विध्यार्थी यांनी श्रम घेतले.