आनंद शिंदे यांची मध्य रेल्वेच्या सोलापुर विभागीय ( DRUCC ) रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती !

आनंद शिंदे यांची मध्य रेल्वेच्या सोलापुर विभागीय  ( DRUCC )रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती 

येवला . प्रतिनिधी



भाजपचे येवला शहराध्यक्ष आनंद शिंदे  यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे लोकप्रीय खासदार श्री.हरिश्‍चंद्रजी चव्हाण साहेब यांनी केलेल्या शिफारशी वरुन भाजपचे सर्वोच्च नेते व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्र सरकारमधील केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांच्या आदेशाने मध्य रेल्वेच्या  सोलापुर विभागीय  ( DRUCC )   रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या मध्य रेल्वेच्या रेल्वेप्रवाशी जनसंपर्क व सल्लागार समितीचा कालावधी 2 वर्षाकरीता राहणार असून  या समितीचे कार्यक्षेत्र (अधिकारक्षेत्र) मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रातील सोलापूर विभागातील दौंड ते वाडी ( वाडी सहित ), दौंड ते मनमाड ( मनमाड सोडुन ), कुर्डुवाडी ते मिरज ( मिरज सोडुन ), कुर्डुवाडी ते लातुर रोड ( सोडुन), पुणतांबा ते साईनगर शिर्डी या रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणार्‍या ९६ पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचे राहणार आहे. येवला हे पैठणी हबच्या रुपाने जगभरात प्रसिद्धीस येत असतांना येवला रेल्वे स्टेशन वर एक्स्प्रेस ट्रेन व महत्वाचे गाड्याना थांबा मिळवून घेणे हे कांदा व्यापारी व व्यापारी वर्गाचे दृष्टीने येवला स्टेशनचा विकास व सेवा सुविधांसह या विभागीय समितीच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशासंबंधी सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था या संदर्भातील तक्रार निवारण, सूचना या संबंधीचे कार्य तसेच रेल्वे प्रशासन व रेल्वे प्रवाशी यांच्या समन्वयाचे कार्य असणार आहे. विभागातील रेल्वे स्थानके व रेल्वे प्रवाशांसंबंधी प्रलंबीत असणार्‍या समस्या प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक असणार्‍या प्रवाशी रेल्वे गाड्यांच्या थांब्यासंदर्भात प्रवाशी सेवा हाच केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे सर्वांना सोबत घेवून रेल्वे संबंधीचे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल, खासदार श्री.हरिश्‍चंद्रजी चव्हाण साहेब यांनी दिलेल्या या विभागीय समितीच्या नियुक्तीच्या जबाबदारीच्या विश्‍वासाला सार्थ ठरवू असा मानस या नियुक्तीवर दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजप शहराध्यक्ष व सोलापुर विभागीयi रेल सल्लागार समितीचे सदस्य आनंद शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आनंद शिंदे यांच्या निवडीबद्दल खा.श्री.हरिश्चंद्रजी चव्हाण,भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव , जिल्हा संघटन सरचिटणीस बापूसाहेब पाटील, मा.आ.कल्याणराव पाटील, ओ.बी.सी.मोर्चा प्रदेशउपाध्यक्ष कैलास सोनावणे, भाजपा जेष्ठ नेते राज्यपरिषद सदस्य श्रीकांतभाई गायकवाड,रमेशमामा भावसार, गोरखनाथ खैरनार,शहरउपाध्यक्ष दिनेश परदेशी, सरचिटणीस मीनानाथ पवार, युवराज पाटोळे, विरेंद्र मोहारे, सागर नाईकवाडे, गणेश खळेकर,भाजपा तालुका अध्यक्ष राजुसिंग परदेशी,प्रा.नानासाहेब लहरे, दत्ता सानप, बडा शिंदे, संतोष काटे, डॉ.नंदकुमार शिंदे,डॉ.गोविंदराव भोरकडे, संतोष केंद्रे, केदारनाथ वेळेंजकर, जनार्दन गंडाळ, निफाड तालुका उपाध्यक्ष निलेश सालकाडेआदी प्रमुख भाजप पदाधिकार्‍यांसह येवला शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

थोडे नवीन जरा जुने