डोंगरगाव कालवा चाचणीसह पालखेड कालव्यावरील बंधारे भरुन द्या बाबा डमाळे यांची जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी




डोंगरगाव कालवा चाचणीसह पालखेड कालव्यावरील बंधारे भरुन द्या

बाबा डमाळे यांची जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी

येवला : प्रतिनिधी

पालखेड कालव्याच्या वितरिका क्रमांक २० ते ४५ वरील व नद्यांवरील सर्व बंधारे पाण्याने भरून द्यावे, पुणेगाव -दरसवाडी- डोंगरगाव कालव्याच्या चाचणीसाठी लागणारे पाणी सोडाव, अशी मागणी भाजपा नेते बाबा डमाळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.
येवला तालुका व लासलगाव- विंचूर परिसरात पर्जन्यवृष्टी कमी प्रमाणात झाले असून पिकाची वाढ खुंटलेली आहे. धरण भागात पावसाचे प्रमाण आता चांगले असल्याने आत्ताच जर नदी-नाले बंधारे पाण्याने भरून दिल्यास भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही. पाणी कालव्याद्वारे सोडल्यास परिसरातील वितरीकां मार्फत शेतकर्‍यांच्या पिकांना लाभ होणार आहे. या पाण्याने तालुक्यातील बंधारेही भरुन दिले तर अल्प पावसात पाणी टंचाईवर मात करता येईल. पालखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रात सर्व नादी, नाले, बंधारे व देवनदी,आयान, कोळगंगा, नारंगी, अगस्ती ,गोरखे, वनारसी, खडकी नाला, गोई यांच्यासह अन्य नद्या या दक्षिण वाहिनी वाहतात. जर पाणी ओव्हरफ्लो झाले तर सर्व नद्या या गोदावरी नदीला सामाविष्ट होतात. यामुळे पाणी कुठेही वाया जाणार नसल्याने सर्व बंधारे पाण्याने भरुन द्यावे, असे डमाळे यांनी म्हटले आहे.
तसेच पुणेगाव-डोंगरगाव-दरसवाडी पोहच कालव्याचे काम ८० टक्के पूर्ण झालेले असून बाळापूर पर्यंत या कालव्याची चाचणी करणे शक्य आहे. यामुळे शेतकर्‍यांचे ३३ वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षी हा प्रयत्न फसला. पण यंदा धरणे भरल्याने या कालव्याच्या चाचणीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी डमाळे यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन व संबंधित पाटबंधारे अधिकार्‍यांकडे केली आहे.

थोडे नवीन जरा जुने