येवल्यात स्व.राजीव गांधी जयंती साजरी....
येवला : प्रतिनिधी
येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तफेॅ स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, येवला येथे राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे व सुरेश गोंधळी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वक्त्यांनी राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, एकनाथ गायकवाड, अॅड. समीर देशमुख, नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, राजेंद्र गणोरे, पटेल तात्या,बळीराम शिंदे, प्रीतम पटणी, संदीप मोरे, संजय पगारे, अमित पटणी, शिवाजी वाबळे, बी. डी. खैरनार सर, बाळासाहेब कसबे, अमित गणोरे ईत्यादी उपस्थित होते.