सेनापती तात्या टोपे शिक्षण मंडळाचे एन्झोकेम विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण उत्साहात......



सेनापती तात्या टोपे शिक्षण मंडळाचे एन्झोकेम विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण उत्साहात......
चारित्र्यसंपन्न शिक्षकच  कर्तृत्ववान व सुसंस्कारित पिढी निर्माण करू शकतात- डॉ. किशोर पहिलवान
येवला : प्रतिनिधी
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एन्झोकेम विद्यालयाचे धावजारोहण सुप्रसिद्ध डॉक्टर व विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. किशोर पहिलवान यांचे हस्ते झाले.
चारित्र्यसंपन्न शिक्षकच सुसंस्कारित व कर्तृत्ववान पिढी घडवू शकतात आणि एन्झोकेम शाळेने आतापर्यंत कित्येक कर्तृत्ववान व संस्कारित पिढ्या घडविल्या आहेत असे प्रतिपादन प्रसिद्ध डॉक्टर व विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. किशोर पहिलवान यांनी केले. येथील तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रत्येकात एक विशिष्ट क्षमता असते, त्या बळावर सामान्य व्यक्तिदेखील इतिहास घडवू शकतात असेही त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण करून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना केवळ डिग्री  न देता काहीतरी विशेष असे टेक्निक द्यावे, जेणेकरून शाळा-महाविद्यालया- बाहेरील जगात त्याला लगेचच रोजगार मिळेल असे सांगतानाच त्यांनी संस्था व विद्यालयाप्रति ऋण व्यक्त केले.   संस्थेचे सचिव सुशीलभाई गुजराथी यांनी प्रास्तविक करताना विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा प्रवास सांगून आजची आव्हाने व गरजा मांडल्या. विद्यालयाचे प्राचार्य दत्ता महाले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांची भव्य अशी प्रभातफेरी शहरातून काढल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. 1857 च्या उठवापासून  पासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत येवल्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान कथन केले. विद्यालयाच्या एन.सी.सी.पथकाने याप्रसंगी ध्वजाला मानवंदना दिली.कार्यक्रमाचे औचित्य साधून तेजश्री फाउंडेशनच्या वतीने जोत्सनाताई पहिलवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'विचार नियम' या पुस्तकाच्या 500 प्रतींचे विद्यार्थ्यांना वाटप केले. विद्यालयाचे12 वीचे उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी मयुरी धनवटे व कर्पे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच विद्यालयाचे शिक्षक उत्तम पुंड, बापू कुलकर्णी, माजी कलाशिक्षक सुरेश भावसार तसेच ओम जगताप, पूजा भाबड, जय देवांग या विद्यार्थ्यांचा वाढदिवसही प्रमुख अतिथींच्या हस्ते  साजरा करण्यात आला. 11 वी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी अर्पिता खैरनार व 7 वी सेमीची प्रियंका जाधव यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तत्पूर्वी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या चित्ररथासह शहरातून एन.सी. सी.च्या पथकासह सर्व विद्यार्थ्यांची भव्य अशी प्रभातफेरी काढण्यात आली. गाडगेबाबाच्या वेशभूषेत प्रसन्न दोडे तर भारतमातेच्या वेशभूषेत ज्योती शिरसाठ हे चित्ररथावर आरूढ होते.
यंदा शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला शिक्षकेतर कर्मचारी विजय मोकळ,संदीप खोजे,अरविंद जोरी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
 कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी सरचिटणीस प्रफुल्ल गुजराथी, माजी नगरसेवक सुभाष पाटोळे,  जोत्सनाताई पहिलवान,संजय सोनवणे, सोपान दोडे,  पुरुषोत्तम वर्मा, भरत वर्मा, रविंद्र काळे, प्रसाद पाटील,  गणेश गायकवाड, सत्यजित कुलकर्णी, रवींद्र भावसार,सुभाष सस्कर, सुरेश भावसार, प्रणय पटेल, सुधीर गुजराथी, गोरख लहरे, प्रमोद तक्ते, भगवान चित्ते, संजय क्षीरसागर, रंजनाताई पहिलवान,धनंजय कुलकर्णी, डॉ.सोनार, डॉ. ठाकरे, अरुण गायकवाड, संध्या पगारे, प्रमोद सस्कर, कृष्णा क्षीरसागर, मनीषा कोकणे, कल्पना कदम, मयूर गोरे, हेमंत व्यवहारे, निवृत्ती वाघमोडे, धोंडीराम पडवळ, नितीन लोणारी, पोस्ट मास्तर देसले, संतोष नागरे, परशराम शिरसाठ, संतोष आहेर, गणेश गायकवाड व बहुसंख्य पालक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सवप्रमुख दत्ता उटवाळे, राजेंद्र गायकवाड, पर्यवेक्षक किशोर जगताप यांनी केले तर आभार विद्यालयाचे उपप्राचार्य संजय बिरारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश विसपुते, प्रकाश सोनवणे, प्रसेन पटेल, विजय क्षीरसागर, सागर लोणारी, रिजवान शेख, सीताराम खोडके, वीणा पराते, सारिका चौधरी, चंपा रणदिवे, सरस्वती नागपुरे, वनिता वाघ, सुरेखा राजपूत, अनिल शेलार, राम पटेल, विजय पैठणे, प्रशांत नागरे, सुरेश कोल्हे विजय मोकळ, संदीप खोजे, भास्कर लहरे, सुरेश गायकवाड, अनिल पगारे, मारुती माळी, अशोक सोनवणे, अरविंद जोरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

===================
फोटो :
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे ध्वजारोहण करतांना डॉ किशोर पहिलवान,समवेत संस्थाअध्यक्ष पंकज पारख,उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल,सरचिटणीस सुशीलभाई गुजराथी,कोषाध्यक्ष रवींद्र काळे,प्रफुल्ल गुजराथी,सुभाष पाटोळे,ज्योत्सना पहिलवान,प्राचार्य दत्ता महाले,पालकवर्ग,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,
 


थोडे नवीन जरा जुने