नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केची सक्तीची वसुली, शेतकरी संघटना आक्रमक

नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केची सक्तीची वसुली, शेतकरी संघटना आक्रमक! 

येवला - प्रतिनिधी
 नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी  कर्जवसुली साठी सक्तीची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचे काम चालु केले असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने जिल्हाधिका-यांना एक निवेदन देऊन केला.
    निवेदनाचा आशय असा कि शेतकर्‍यांनी पिक कर्ज घेऊन पिक उभे केले, दोन वर्षे दुष्काळ आणि मागील वर्षी चांगले पिकं आले तर नोट बंदीचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसला. शेतीमाल मातीमोल विकावा लागला. नंतर पैसा नसल्याने चेक देऊन व्यापाऱ्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे राज्याने पाहिले. आज सुद्धा अनेक शेतकर्‍यांचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकून पडले आहेत.
        नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या पिक कर्ज, मध्यम मुदत,दिर्घ मुदत कर्ज या  वसुली साठी  जप्ती, लिलाव या सारखे अघोरी उपायाचे हत्यार उपसल्याने शेतकरी धास्तावले असल्याचे शेतकरी संघटनेने या निवेदनाद्वारे  शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
       नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्क शेतकरी कर्जामुळे अडचणीत आली नसून अअनेक संचालकांच्या संस्था, तोट्यात आलेले साखर कारखाने यांना मनमानी कर्ज वाटप करण्यात आले. आणि त्या सर्वावर नोटबंदीची छाप म्हणून सहकारी बँका अडचणीत आल्या हे शेतकरी संघटनेने अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्या निदर्शनास आणून देतानाच यावर त्वरित कारवाई होऊन सक्तीची वसुली तातडीने थांबविण्यात यावी अन्यथा शेतकरी संघटना जिल्हाभर आंदोलन उभारेन असा ईशारा दिला.
       अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी  तातडीने जिल्हा उपनिबंधकांशी बैठक बोलावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिले व जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क करण्याचे आश्वासन दिले व संबंधित निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, शेतकरीसंघटना जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे ,तालुकाध्यक्ष अरूण जाधव ,निफाडचे सांडुभाई शेख,रामकृष्ण बोंबले, शंकर पुरकर , बाळासाहेब गायकवाड, योगेश सोमवंशी, भगवान बोराडे विलास कवडे,  यांच्यासह शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने दिली.
थोडे नवीन जरा जुने