४ शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणाचे पालकत्व सोनवणे यांनी स्वीकारल्याने
चिमुरड्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद
येवला | दि. १७ प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील बरफळवाडी शेतमजूरी करण्यासाठी येथे स्थलांतरित झालेल्या शेतमजुर थिटे कुटुंबातील चार कन्यांचा १५ ऑगस्ट रोजी खर्या अर्थाने स्वातंत्र्य दिन उगवला आहे. शाळाबाह्य असलेल्या या वनिता आणि वैष्णवी तर अजूनही शाळेत न गेलेल्या गायत्री थिटे वय ६ आणि भाग्यश्री वय ४ या मुलींच्या हाती स्वातंत्र्य दिनी जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी पाटी दप्तर आणि नवे कपडे देत त्यांच्या शिक्षणाला सुरुवात केली.
पोटाची खळगी भरण्यासाठी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातून आशामती थिटे आणि दादाराव थिटे हे जोडपं तालुक्यातील कोटमगाव येथे पी. बी. एस. गुरुकुल या शाळेजवळील शेतात शेत मजूर म्हणून राहत आहे. त्यांच्या चारही मुली शाळाबाह्य आहेत. या शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारी करणार्या व ऐटीत चालणार्या शाळेतील मुलांना त्या शाळेच्या कुंपणावरून चार ते पाच दिवसापासून न्याहळत होत्या. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष भागवतराव सोनवणे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. सोनवणे यांनी या मुलींच्या कुटुंबाची चौकशी करून २ मुलींना शाळेत विनाशुल्क प्रवेश दिला. थिटे कुटुंब जो पर्यंत येवल्यात असेल तो पर्यंत त्यांचा खर्च प्रज्ञा फौंडेशन चे संस्थापक सोनवणे हे करणार आहेत.
एकीकडे देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. पण अजूनही देशभरात मुलींच्या शिक्षणाची आबाळ सुरू आहे. विशेषतः काळ्या मातीत राबणार्या शेतकरी, शेतमजूर कुटूंबे आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत ही दाहक वास्तवता आहे.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भाग्यश्री, गायत्री आणि वैष्णवी यांना शाळेचे दप्तर, गणवेश देण्यात आले. ध्वजारोहण प्रमुख अतिथी सेवा निवृत्त सैनिक नामदेव बेंडके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वाघ, मार्गदर्शक डी. पी. गायकवाड, प्राचार्य टी. बी. लासुरे, पी. एन. बच्छाव, के. डी. काळे, डी. एस. कोटमे या सह पालक ध्वजारोहनास उपस्थित होते.
मुले शिक्षणापासून वंचित ही बाब सुनa्न करणारी
येवले शहरालगत कोटमगाव उड्डान पुलालगत असलेल्या पी. बी. एस. गुरुकुल या आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनाची तयारी, संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरु होती. गेल्या चार ते पाच दिवसापासून येथील लहान मुलांचे शिस्तबध्द चालणे, कवायत करणे, इतर कार्यक्रम सादर करणे, या बाबी या चारही मुली कुंपना पलिकडून दररोज न्याहळत होत्या. छोट्या दोन मुली या मुलांचे अनुकरणही करत होत्या. ही बाब आमच्या शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या निदर्शनास आणुन दिली. त्या मुलींच्या पालकांकडे या चार मुलींची चौकशी केली असता एकही मुलगी शाळेत जात नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही शेतमजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात, ही बाब मन सुन्न करणारी होती. मी त्या पालकांना विनंती केली आणि त्या सर्व मुलींना शाळेचा सर्व खर्च करण्याचे सांगताच त्यांनी सर्व मुलींना १५ ऑगष्ट पासून शाळेत पाठवले.
- भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती