दिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला जे के जाधव साहित्य पुरस्कार प्रदान !
येवला : प्रतिनिधी
येथील विद्रोही कवी प्रा. शिवाजी भालेराव यांच्या दिंडी निघणार आहे या काव्य संग्रहास वाड्:मयीन चळवळीशी बांधीलकी जपणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जे. के. जाधव साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील जे. के. जाधव कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने राज्यातील दर्जेदार काव्य संग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण २३ रोजी दुपारी १२ वाजता वैजापूर येथील विनायकराव पाटील सभागृहात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे मा.अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जे.के. जाधव यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रम प्रसंगी पोलिस निरिक्षक सुनिल लांजेवार, गटाविकास अधिकारी पवार, आयोजक डॉ. प्राचार्य भिमराव वाघचौरे, जेष्ठ कादंबरीकार ऋषीकेश देशमुख, जगदीश कदम आदी. मान्यवर उपस्थित होते. या आगोदर दिंडी निघणार आहे, या काव्य संग्रहाला बडोदा येथील मराठी वाड्:मयीन परिषदेच्या वतीने देण्यात येणारा अभिरुची गौरव पुरस्कार मिळाला आहे.