महाराष्ट्र चर्मकार उठाव संघ महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निर्मला थोरात


महाराष्ट्र चर्मकार उठाव संघ महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निर्मला थोरात
येवला - प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य चर्मकार उठाव संघच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या नेत्या निर्मला गणपत थोरात यांची निवड करण्यात आली आहे. चर्मकार उठाव संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव कानडे यांनी थोरात यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी सचिव विजय हासे, राज्य उपाध्यक्ष गोकुळदास वाघ उपस्थित होते.
निर्मला थोरात या येवला शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या असून येवला तालुका दक्षता व पुरवठा समिती तसेच समन्वय आणि पुर्रविलोकन समिती सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे. थोरात यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. जिल्ह्यातील चर्मकार महिलांमध्ये संपर्क साधुन जागृती करणे तसेच बचत गटासारख्या सबलीकरणाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने