बनकर पाटील स्कूल मध्ये ‘येलो डे’ ची धमाल ..



 
बनकर पाटील स्कूल मध्ये 'येलो डे' ची धमाल ..
येवला - प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बनकर पाटील पब्लिक स्कूल, येवला येथे प्री-प्रायमरी विभागाचा 'येलो डे' मोठ्या उत्साहात पार पडला. या दिवसाचे महत्व म्हणजे विद्यार्थ्यांना
पिवळ्या रंगाची अगदी सहजपणे ओळख व्हावी व त्यांनी तो स्वतः अनुभवावा असे आहे. या दिवसाच्या माध्यमातून त्यांना पिवळ्या रंगाची पुरेपूर माहिती त्या रंगांच्या विविध गोष्टी समोर ठेऊन देण्यात आली.
यावेळी शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांना विविध उपक्रम करण्यास सांगितले होते. त्यामध्ये नर्सरी विभागाने कागदापासून पिवळ्या रंगाचे फळे –अननस , केळी, आंबा , मका , लिंबू पेपर बनविले व शाडू मातीपासून विविध फळे बनविले. केजी-१ विभागाने पिवळ्या रंगाच्या फळांचे चित्र रंगविले. केजी-२ च्या विभागाने कागदावर विद्यार्थ्यांच्या बोटांचे पिवळ्या रंगाचे ठशे उमटविले व या दिवसाचे महत्व स्वतः विद्यार्थ्यांनी विषद केले. अशाप्रकारे हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वत्र पिवळ्या रंगाचे फुगे, विविध चार्ट, पिवळ्या कागदापासून बनविलेले आंबा,केली,अननस इ.फळे बनविण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण पिवळा वेश परिधान केला होता अशा विद्यार्थ्यांना मुकुट घालून प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट चे वाटप करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची चा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षिका करंडे भावना ,शिंदे प्रतिभा ,पाचंगे कल्पना , जाधव दिपाली, पानगव्हाणे वृषाली,भावसार स्वाती यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शाळेचे कार्यकारी संचालक श्री.प्रविण बनकर व शाळेचे प्राचार्य श्री. निकम पंकज यांनी सर्वांचे कौतुक केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने