न्यू.इंग्लिश स्कूल,उंदीरवाडी चे शालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश



न्यू.इंग्लिश स्कूल,उंदीरवाडी चे शालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

येवला : प्रतिनिधी
- तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा एस.न.डी इंग्लिश मीडियम स्कूल,बाभूळगाव येथे आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत  विद्यालयाने  घवघवीत यश संपादन केले.
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ ,संचलित न्यू इंग्लिश स्कूल,उंदीरवाडी या विद्यालयातील विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यालयातील विध्यार्थ्यांनी स्पर्धत यश संपादन केले आहे.
 १४ वर्षांवरील मुले,१७ वर्षांवरील मुली
१४ वर्षांवरील मुली या तिन्ही गटात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे  विद्यालयातील संघांला जिल्हा पातळीवर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली.वरील तिन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख ,पदाधिकारी व सदस्य ,विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी सदिच्छा दिल्या.या तिन्ही संघाला क्रीडा शिक्षक दिलीपसिंग गिरासे  व.पगारे सर यांनी मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

थोडे नवीन जरा जुने