बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बनकर पाटील पब्लिक स्कूल  मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...


येवला . प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , बनकर पाटील पब्लिक स्कूल, अंगणगाव येथे सकाळी ठीक ०९.३५ वाजता कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध  वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश कांबळे यांच्या शुभहस्ते व अंबादास बालाजी बनकर याच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम  संपन्न झाला. 
या प्रसंगी प्रभाकर बोराळे, बाळासाहेब देवराम बोराळे, भाकरराव गंगाधर गायकवाड , दगडू पा. टर्ले, भुषण गोठी व अंगणगाव येथील सैनिक भारत व मंगेश शेलार हे दोन बंधू आणि  संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण बनकर,प्राचार्य पंकज निकम आणि पालक प्रतिनिधी सेवानिवृत्त सैनिक किशोर राठोड व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सवाद्य "छोडो कल कि बाते" हे देशभक्तीपर  समूहगीत सादर केले. तद्नंतर प्री-प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लाठी काठी या साहसी खेळाचे  प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेचे विद्यार्थी आराध्या भावसार, अर्णव साताळकर,चव्हाण श्रुती, अर्णव जगताप, देवरे तन्मय , मोरे प्रेरणा, बनकर राजेश्वरी व शिंदे साईश्वरी यांनी देशभक्तीपर भाषण  केले. स्वयम भांबारे याने ड्रम वादन करून उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी डॉ.कांबळे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच पूर्व प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तांची वेशभूषा करून उपस्थितांची वाहवाह मिळविली .  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेवाळे प्रद्युम्न व प्राची पाटोळे या विद्यार्थ्यांनी केले व आभार प्रदर्शन वंदना आहेर  यांनी केले. 


थोडे नवीन जरा जुने