स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निदर्शने

 

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने  जाहीर निदर्शने

 येवला : प्रतिनिधी
शहरातील विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. १४ मंगळवारी संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यस शहर काजी रफिउद्दीन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शहराध्यक्ष अजहर शेख यांनी दिपप्रज्वलन केले. यावेळी भिमस्मरण व भिमस्तुती घेण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. निदर्शने करुन यानंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी अजिज शेख, प्रा. अर्जुन कोकाटे, शशिकांत जगताप, दौलत गाडे, रेखा साबळे, आशा आहेर, रंजना पठारे यांनी आपल्या भाषणातुन सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष पगारे म्हणाले की, १५० वर्ष पारतंत्रत गेलेल्या भारत देश हा स्वातंत्र्य झाल्यानंतर विविध जातीधर्मांनी वेषभाषांनी नटलेल्या देश एकसंघ ठेवण्यासाठी डॉ. आंबेडकर अहोरात्र प्रयत्न भारतीय संविधान लिहून अशा संविधानाला जाळणे म्हणजेच लोकशाहीला जाळणे, जातीयतेचे दंगे भडकविणे होय. बाबासाहेब मुर्दाबाद, मनुवाद जिंदाबाद घोषण देऊन भारतीय लोकांच्या मनात विष पेरणार्‍या देशद्रोहांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांचे भारतीयत्व रद्द करा. अन्यथा स्वारिपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पगारे यांनी दिला. यावेळी विधाता आहिरे, दत्तु वाघ, अहमजा मन्सुरी, आकाश घोडेराव, बाळु सोनवणे, बाळु आहिरे, विनोद त्रिभुवन, वसंत घोडेराव, सुरेश धिवर, संतोष वाघ, कांतीलाल पठारे, राजेंद्र गायकवाड, श्रीधर आहिरे, कांताबाई गरुड, शोभा उबाळे, शोभा घोडेराव, ज्योती पगारे, मनिषा शिंदे, वाल्हुबाई गायकवाड, गंगुबाई पगारे, कांताबाई आहेर, झुंबरराव पगारे, प्रियंका गायकवाड, मंगल पगारे, तुळसाबाई पगारे, सविता पठारे आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.



थोडे नवीन जरा जुने