पाटोदा केंद्रशाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
येवला : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पाटोदा येथे ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.पंचायत समिती सदस्या सुनीताताई मेंगाणे व सरपंच अनिताताई धनवटे यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन करण्यात आले ,तर जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती व सदस्य, माजी सरपंच व उपसरपंच,सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व संचालक,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.