साताळी ता येवला जि नाशिक येथील ग्राम पंचायतीचे ध्वजारोहण येवला तालुका सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच सुमनबाई कोकाटे यांनी ध्वजपुजन केले
तसेच जि प प्राथ सेमी ईंग्रजी शाळेचे ध्वजपुजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताजी काळे यांनी तर ध्वजपुजन सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी केले
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविणजी पठारे यांनी शाळेसाठी डेल कंपनीचे दोन संगणक सी पी यु बक्षीस दिले व मुलांना शाळेच्या प्रांगणात अभ्यासासाठी बसण्यासाठी जलाराम टाईल्स अंगणगावचे संचालक राजुभाऊ पवार यांनी शाळेला दोन सिमेंटचे बेंच दिलेत त्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत केले
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ ची माहीती सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी मुलांना व ग्रामस्थांना दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टीक बंदी व शाैचालयाचा वापर या विषयावर पथनाट्य सादर केले व सर्व मुलांनी मराठी,हिंदी व ईंग्रजी भाषेतुन स्वातंत्र्य दिना बद्दल भाषणे केलीत
यावेळी येवला तालुका राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष तुळशीराम कोकाटे,तंटामुक्ति अध्यक्ष मंच्छिद्र काळे,गोरखनाथ काळे,दिलीप काळे,अभिमन्यु आहेर,वेणुनाथ राजगुरू,विका सोसा चेअरमव सुकदेव काळे,सदस्य गणेश कोकाटे,विका सोसाच्या संचलिका आपेक्षा कळसकर,राधाकिसन आहेर,वाल्मीक काळे,सुनिल सोनवणे,बाळु काळे,सुनिल आहेर,शिवराम आहेर,पोलिस पाटील ज्योती काळे,छबु कोकाटे,प्रियंका सोनवणे,अंगणवाडी सेविका संगीता ,कविता अहीरे,आशा कार्यकर्ती सरला जाधव,राधिका कोकाटे,तुषार सोनवणे,वसंत मोरे आदी उपस्थित होते .