अंकाई टंकाई किल्ल्यावर ३० हजार बियांचे बीजारोपण
येवला : प्रतिनिधी
विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा व मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनावणे जुनियर कॉलेज, अंदरसूल यांच्या संयुक्त विद्यमाने काल अंकाई टंकाई किल्ल्यावर ३० हजार बियांचे बीजारोपण करण्यात आले. यामध्ये रेंट्री, रावळ बाभूळ, सीताफळ, करंज, कांचन, काशिद, शिरस या सात जंगली जातीच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. त्याच बरोबर बिजोरोपनानंतर विद्यार्थ्यांसाठी कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनात मनमाडचे कवी खालील मोमीन, सिने अभिनेते संतोष परदेशी, महेश शेटे, मुजम्मील चौधरी, शालिनी वालतुरे यांनी आपल्या रचना सादर केल्या. सदर प्रसंगी बोजोरोपण अभियानात जुनियर कॉलेज च्या २३५ मुले-मुली, १५ शिक्षक, सावलीचे २५ स्वयंसेवक सहभागी झालेले होते. अभियानाचे प्रास्तविक प्राचार्य सचिन सोनावणे यांनी केले. अभियानाच्या यशस्विते साठी पंकज मढवई, मुकुंद अहिरे, मछीन्द्र काळे, अनिल निकम, सतीश बागुल, द्यानेश्वर निकम, परसराम शेटे, कविता गायकवाड, अक्षय खैरणार, संतोष सोनवणे यांनी परिश्रम घेतले. संदीप बोढरे यांनी आभार व्यक्त केले.