येवल्यात गुरुवारी आमदार दराडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची आढावा बैठक

 

येवल्यात गुरुवारी आमदार दराडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची आढावा बैठक

 

येवला : प्रतिनिधी

 पंचायत समिती स्तरावरील ग्रामपंचायत व नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना चालना देण्यासह विविध विकासकामांचा योजनांचा आढावा घेण्यासाठी येथील पंचायत समितीची आढावा बैठक गुरुवारी आयोजित केली आहे,अशी माहिती आमदार किशोर दराडे यांनी दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांची पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांसह वैयक्तिक स्वरूपाची कामे होत असतात या कामांना अधिकारी स्तरावर चालना मिळते परंतु विविध तांत्रिक व इतर अडचणींमुळे काही कामे रेंगाळून पडतात.अनेकदा नागरिक कार्यालयांमध्ये या कामांसाठी चकरा मारून वैतागतात तरी ही कामे मार्गी लागत.तसेच काही कामांबाबत अधिकारी स्तरावरही अडचणी असतात या सर्व प्रकाराविषयी आमने सामने चर्चा होऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे व नव्या कामांना गती मिळावी या हेतूने येथील आसरा लॉन्स येथे दुपारी अकरा वस्ता आमदार दराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक होणार आहे.या बैठकीला आमदार नरेंद्र दराडे,जेष्ठ नेते माणिकराव शिंदे,माजी सभापती संभाजी पवार,सभापती नम्रता जगताप,गटविकास अधिकारी सुनील आहिरे,जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दराडे,सविता पवार,कमलबाई आहेर,संजय बनकर,महेंद्रकुमार काले तसेच सर्व पंचायत समिती सदस्य,गावोगावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य आदींची उपस्थिती राहणार आहे.

या बैठकीत जन सुविधा योजनेचे कामकाज,नविन प्रस्ताव सादर करणे,यात्रा स्थळांबाबत नवीन '' वर्ग प्रस्ताव सादर करणे, ठक्कर बाप्पा योजनांचे प्रस्ताव सादर करणे,अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक योजनेचा विकास करणे व नविन आराखड्याप्रमाणे प्रस्ताव सादर करणे,अंगणवाडी इमारत प्रस्ताव सादर करणे आणि नागरी सुविधा योजनाचा आढावा यावर चर्चा केली जाणार आहे.अनेक व्यक्तिगत प्रश्नावर देखील चर्चा करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.या बैठकीसाठी ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,शाखा अभियंता सर्व,उप अभियंता,

गटशिक्षणाधिकारी,पशुधन विकास अधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी,कृषी अधिकारी तसेच सर्व विस्तार अधिकारी,मुख्य सेविका उपस्थित राहणार आहेत.गावासह वैयक्तिक कामांची सोडवणूक करण्यासाठी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन दराडे यांनी केले आहे.


 
 
 


थोडे नवीन जरा जुने