अनकुटे येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात अनेक ओबिसी तसेच भटके समाज बाधंवानी घेतला प्रवेश
येवला- प्रतिनिधी
येवला तालुक्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या झंझावात सुरुच असुन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांचे नेतृत्व विविध जाती धर्माचे लोक स्विकारत असुन अनेक युवक पक्षात प्रवेश करत आहे. त्याचाच ऐक भाग म्हणून तालुक्यातील अनकुटे येथे शनिवार दि,25 रोजी संध्याकाळी ठिक 5वा पक्षाच्या शाखेचे नुतनीकरण, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी अनेक ओबीसी व भटके समाज बाधंवाचा प्रवेश घेवून त्यांनी पक्षाच्या शाखाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, पक्षाचे सल्लागार अजीजभाई शेख, महिला आघाडी च्या नेत्या आशा आहेर, अँड बापु गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच शहर, तालुका, महिला आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहराध्यक्ष अजहरभाई शेख, ता,कार्याध्यक्ष विजय घोडेराव, शहर उपाध्यक्ष आकाश घोडेराव, ता,सचिव शशिकांत जगताप, हमजाभाई मनसुरी, अॅड अनिल झाल्टे, बाळासाहेब गायकवाड, वसंतराव घोडेराव, हरीभाऊ आहिरे, वाल्मिक तळेकर, बाबासाहेब गायकवाड, अशोक बाबा गायकवाड, नंदू तळेकर, विजय गायकवाड, माधव गायकवाड, रघू गायकवाड, सचिन शेलार, आकाश गोतीष, ॠतीक चव्हाण, महिला नेत्या रंजना पठारे, कान्तांबाई गरूड, ज्योती पगारे, वर्षा पगारे, द्रोपदाबाई गोतीष यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.