ईकरा अरबी मदरसा शाळेत सदभावना दिन साजरा




ईकरा अरबी मदरसा शाळेत सदभावना दिन साजरा 
येवला : प्रतिनिधी

नेहरु युवा केंद्र नाशिक सामाजिक विकास बहू उद्देशिय सेवाभावी संस्था येवला यांच्या संयुक्त विद्यमाने ईकरा अरबी मदरसा शाळेत सदभावना दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरवातीला राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सदभावना दौड स्वच्छ भारत अभियान असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फारूक शेख हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवाकर्मी अश्विनी जगदाळे यांनी केले प्रास्ताविक भाषण आफरीन शेख यांनी केले अजहर शाह यांनी विध्यार्थ्यांना सदभावना दिनाची विशेष  महिती दिली तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त सदर सदभावना दिन साजरा करण्यात येतो असे ही त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या मनात  स्वछता विषयी जागरूकता निर्माण करून त्यांनी आपापल्या घरी स्वच्छतेचे पालन करावे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अजहर शाह सिद्दीक भाई शकिर शेख मोईन शेख नबील शाह आदी उपस्थित होते यावेळी विध्यार्थ्यांनी सदभावना दौड मध्ये सहभाग घेतला तसेच स्वच्छता मोहीम ही राबवण्यात आली यावेळी सदर परिसरात रस्त्याच्या कडेने असलेले गवत कट करुन साफ करण्यात आले कार्यक्रमात स्थानिक लोकांनी ही सहकार्य केले अजहर शहा यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली
फारूक शेख यांनी सदर कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच राजीव गांधी यांना आपले देश संगणक व माहीती तंत्रज्ञान मध्ये खूप पुढे न्यायचे होते त्यांचे स्वप्न आज साकार झाले असे वाटत कारण ईकरा अरबी मदरसा शाळा संपुर्ण संगणकावर आधारित अभ्यासक्रम विध्यार्थ्यांना देत आहे ही गोष्ट अभिमान स्पद आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले व शाळेचे कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी जगदाळे आफरीन शेख इशरत खान सुलताना शेख हाफिज मुसईब आदिंनी परिश्रम घेतले

थोडे नवीन जरा जुने