संविधानाच्या प्रती जाळणार्‍या व आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणारा श्रीनिवास पांण्डे व इतर साथीदारांना कडक शासन करावे

 




संविधानाच्या प्रती जाळणार्‍या व आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणारा श्रीनिवास पांण्डे व  इतर साथीदारांना कडक शासन करावे,
 येवला : प्रतिनिधी
संविधानाच्या प्रती जाळणार्‍या व आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणारा श्रीनिवास पांण्डे व  इतर साथीदारांना कडक शासन करावे, अशी मागणी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्या वतीने शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे. 
जंतर-मंतर दिल्ली येथे काही समाजकंट श्रीनिवास पांण्डे व इतर साथीदारांनी पवित्र भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या आहेत. तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अतिशय आकस उपदेश भावना मनात ठेऊन डॉ. आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सदर घटनेचे चित्रिकरण करुन सोशल मिडीयावर प्रसारित केलेल्या आहेत. यामुळे आंबेडकरी विचारांच्या भावना  दुखावल्या आहे. या समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या त्याच्या विरुद्ध  भारतीय संविधान कायदा कलम ऍक्ट १९७१ व १२४ अ व जातीवाचक प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करुन कडक शासन करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) तालुकाध्यक्ष गुड्डु जावळे, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब कसबे, शहराध्यक्ष प्रविण नेतकर, मंगेश शिंदे, सुनील घोडेराव, सागर धिवर, विलास त्रिभुवन, समाधान धिवर, संदिप धिवर, दौलत शेजवळ, जितेंद्र गांगुर्डे, कृष्णा त्रिभुवन, राजेंद्र गुंजाळ, अविनाश धिवर, सुनील घोडेराव, वाल्मिक धिवर, विजय पडवळ, रोहित जावळे, अनिकेत जावळे, रितीक भुसे, विशाल जावळे, आकाश शिंदे आदींच्या स्वाक्षर्‍या आहे. 

थोडे नवीन जरा जुने